Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बॅंक कर्मचारी नीलिमा घरी पोहचलीच नाही; मृतदेहच आढळून आला

बॅंक कर्मचारी नीलिमा घरी पोहचलीच नाही; मृतदेहच आढळून आला 


दापोली येथील स्टेट बँकेत कंत्राटी कर्मचारी असलेली नीलिमा सुधाकर चव्हाण (वय २४) ही युवती बेपत्ता होती. पण, दाभोळ समुद्रकिनारी नीलिमा हिचा मृतदेह मिळाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. तिचा बुडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नीलिमा हिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे शवविच्छेदन अहवालानंतर समजणार आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

दापोली येथून निघालेली नीलिमा चव्हाण अद्याप घरी न पोहोचल्याने तिची सर्वत्र शोधाशोध सुरु झाली होती. त्यानंतर तिच्या भावाने दापोली येथील तिच्या एका जवळच्या मैत्रिणीला फोन केला. त्यावेळी तिने नीलिमा मी गावी ओमळी येथे जात आहे, असे सांगून निघाली होती, अशी माहिती दिली. दरम्यान बेपत्ता झालेल्या नीलिमा हिचे शेवटचे लोकेशन खेड असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली. तिच्या घरच्यांनी चिपळूण परिसरातही नीलिमा हिची शोधाशोध केली. मात्र ती कुठेच सापडली नाही.

निलीमा 29 जुलैपासून बेपत्ता झाल्याने दापोली पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. शनिवारी सकाळी नऊच्या दरम्यान ती मैत्रिणीला सांगून दापोली शहराजवळ असलेल्या जालगाव लष्करवाडी येथून निघाली होती. शनिवारी दोन दिवस सुट्टी असली की ती नेहमी आपल्या गावी जात असायची. 28 जुलै रोजी शुक्रवारी रात्री आठच्या दरम्यान तिने आपला भाऊ अक्षय याला कॉल करून 'मी उद्या सकाळी घरी येत आहे', असे कळवले होते. पण, तिचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

दाभोळ खाडी परिसरात मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच तात्काळ दाभोळ सागरी पोलिस ठाण्याच्या सहाय्यक निरीक्षक पूजा हिरेमठ, सागर कांबळे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. आकस्मिक मृत्यू अशी नोंद दाभोळ पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. या प्रकरणी अधिक तपास दाभोळ आणि दापोली पोलिस करत आहेत. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जाणार आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.