घरी मुले सांभाळत नसल्याने आत्महत्या करण्यास गेलेल्या महिलेस अंकलीतील तरुणांनी व सांगली पोलीस ग्रामीण पोलीस आणि वाचवले..
घरात कोणी सांभाळत नसल्याने आत्महत्या करण्यासाठी अंकली नदी पुलावर गेलेल्या जयसिंगपूरच्या संगीता मनोहर घोरपडे या महिलेस अंकली येथील दोन मुलांनी सांगली ग्रामीण पोलिसांच्या मदतीने त्या महिलेस वाचवण्यात यश मिळवले.
शुक्रवारी सायंकाळी एक महिला आपली पुलावरून नदीत उडी मारून आत्महत्या करत असल्याचे 112 डायल नंबर वर सांगली ग्रामीण पोलिसांना फोन आला त्यावेळी फौजदार रामराव पाटील, हवालदार अक्षय माने, देवानंद नागरगोजे हे तात्काळ अंकली नदी पुलावर यांनी धाव घेतली त्यावेळी अंकली येथील वरद सुदर्शन शिंदे ,किशोर सुनील कोलप यांनी या महिलेस आत्महत्यासाठी नदीत जात असताना पुलावरच पकडून ठेवले.पोलिसांनी धाव घेत जयसिंगपूर येथील संगीता घोरपडे (वय५२) या महिलेस सांगली ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये आणले असता दोन मुले, एक मुलगी आहे पण मला सांभाळत नाहीत मग मी जगून काय करू म्हणून मी आत्महत्या करण्यासाठी अंकली कृष्णा नदी पुलावर गेल्याचे सांगितले. त्यावेळी पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड ,रामराव पाटील ,अक्षय माने, देवानंद नागरगोजे यांनी त्या महिलेची समजूत काढली. अंकली पुलावर आत्महत्या करण्यासाठी सतत अनेक जण प्रयत्न करतात पण सांगली ग्रामीण पोलीसानी मात्र कार्य तत्परता दाखवत आत्महत्येपासून अनेकांचे जीव वाचवले आहे त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.