जोरजोराने ढेकर दिली म्हणून दोन शेजाऱ्यांमध्ये तुफान राडा
इंदूरच्या एमआयजी परिसरात रविवारी ही घटना घडली. या परिसरात राहुल सिरसीवाल आणि आकाश टाटावाले हे तरुण राहतात. रविवारी राहुल याची आई अंजू घरात जोरजोराने ढेकर देत होती. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या टाटावाले कुटुंबाने तिच्या ढेकराच्या आवाजाचा त्रास होत असल्याची तक्रार त्यांच्याकडे केली. त्यावर राहुल याचे वडील दिनेश यांनी अंजू यांना पित्ताचा त्रास असल्याचं सांगितलं.
पण, त्यावरून टाटावाले आणि सिरसीवाल यांच्यात वाद सुरू झाला. हा वाद इतका वाढला की एकमेकांवर चाकूने हल्ला देखील करायला सुरुवात केली. अन्य शेजाऱ्यांपैकी कुणीतरी पोलिसांना याची माहिती दिली. त्यावरून पोलीस धावत आले आणि त्यांनी या दोन्ही कुटुंबाना पोलीस स्टेशनमध्ये नेलं. तिथे या वादामागचं कारण ऐकून पोलिसांनीही कपाळावर हात मारला.
टाटावाले यांच्या तक्रारीनुसार, सिरसीवाल यांच्या घरातून सतत मोठमोठ्याने आवाज येतात. त्यामुळे आधीच त्रास होत होता. त्यात रविवारी सुट्टीच्या दिवशी या ढेकराच्या आवाजाची भर पडल्याने ते संतापले, अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.