इस्लामाबाद- पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून अनवर ऊल हक्क काकर यांची निवड करण्यात आली आहे. काकर बलुचिस्तानचे रहिवाशी आहेत. पाकिस्तानचे शहबाज शरीफ सरकार बर्खास्त झाल्यानंतर शनिवारी कार्यवाहक सरकारची स्थापना करण्यात आली होती.
राष्ट्रपतींनी त्यांना शनिवार पर्यंत काळजीवाहू पंतप्रधान निवडण्यास सांगितले होते. चर्चेच्या अनेक फेऱ्या झडल्यानंतर अनवर रुल हक्क काकर यांची निवड करण्यात आली. आजच ते पंतप्रधान पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वी राजीनामा दिलेले शहबाज शरीफ आणि नॅशनल असेंब्लीतील विरोधी पक्षनेते राजा रियाज यांना शनिवारपर्यंत राष्ट्रपतींकडे काळजीवाहू पंतप्रधानाचे नाव द्यायचे होते. त्यानंतर अनवर यांच्या नावावर दोन्ही नेत्यांनी एकमत व्यक्त केलं. अनवर बलुचिस्तान प्रांतातून असून ते शनिवारीच पदाची शपथ घेतील असं सांगण्यात येतंय. पाकिस्तानची संसद ९ ऑगस्ट रोजी बर्खास्त करण्यात आली होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.