Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पेन्शन मागणीसाठी आटपाडीत जनता दलाचा रास्ता रोको; खासदार - आमदारांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा





साठ वर्षांवरील ज्येष्ठांच्या पेन्शनसाठी आज (दि.२) आटपाडी येथे पंढरपूर-कऱ्हाड राज्यमार्गावरील साईमंदिर चौकात ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले.

यावेळी आमदार आणि खासदारांच्या घरासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.

जनता दलाचे तालुकाध्यक्ष आबासाहेब सागर यांच्या नेतृत्वाखाली आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे आटपाडी ते भिवघाट रस्ता एक तास बंद होता. यामुळे आटपाडी ते भिवघाट दरम्यानची वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी सागर यांनी पेन्शन मागणीसाठी दि. १६ ऑगस्ट रोजी खासदार संजय पाटील आणि दि. ३० ऑगस्ट रोजी आमदार सुमन पाटील आणि त्यानंतर आमदार अनिल बाबर, गोपीचंद पडळकर यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला.

ते म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारने साठ वर्षांवरील ज्येष्ठांना मासिक पाच हजार रुपये पेन्शन सुरू करावी या मागणीसाठी जनता दलाचा लोकशाहीच्या मार्गाने लढा सुरू आहे. आंदोलनाची दखल घेत केंद्राने शेतकऱ्यांसाठी सन्मान निधी दिला. राज्य सरकारनेही ‘नमो योजना’ सुरू केली आहे. परंतु, साठ वर्षांवरील ज्येष्ठांना वगळण्यात आले आहे. पेन्शनची मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.

या आंदोलनात सुमित पाटील, रामचंद्र कोळेकर, माणिक पांढरे, बजरंग पाटील, बजरंग गटकुळे, सागर चौगुले, विजय गोपाळकर, कलावती जानकर, आवडाबाई सदामते आणि २०० हून अधिक वयोवृध्द स्त्री-परुष सहभागी झाले होते

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.