Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

७ वर्षीय मुलीवर अत्याचार करुन खून, मृतदेह गुरांच्या चाऱ्यात लपवला

७ वर्षीय मुलीवर अत्याचार करुन खून, मृतदेह गुरांच्या चाऱ्यात लपवला

जळगावमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. येथील भडगावमध्ये एका अल्पवयीन मुलीचा खून करुन तिचा मृतदेह गुरांच्या चाऱ्यामध्ये लपवून ठेवला असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सर्वांना एकच धक्का बसला आहे.

याबाबत पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचे पडसाद अधिवेशनात उमटले आहेत. याप्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. यामुळे आता पोलीस तपास करत आहेत. स्वप्नील विनोद पाटील असे या संशयिताचे नाव आहे. त्याने लैगिंक अत्याचार केल्यानंतर मुलीशी झालेल्या झटापटीत मुलीच्या डोक्यात दगड घातला. यामध्ये मुलीचा मृत्यू झाला. त्यानंतर तिचा मृतदेह गुरांच्या गोठ्यातच चाऱ्यामध्ये लपवून ठेवला.

या घटनेनंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी पोलिसांच्या वाहनावरच दगडफेक केल्याची माहिती देखील समोर आली आहे. दरम्यान, ज्या कडब्याच्या कुट्टीत या मुलीचा मृतदेह मिळाला तो गोठा स्वप्नील विनोद पाटील याचा असल्याने पोलिसांचा त्याच्यावर संशय बळावला होता. त्याने अखेर या गुन्ह्याची कबुली दिली.

पिडीत मुलगी दुपारी घरी एकटी असताना गावात राहणारा स्वप्नीलने पिडीत मुलीला गुरांच्या गोठ्यात बोलावून घेतले. त्यानंतर स्वप्निल पाटील याने मुलीसोबत जबरदस्ती केली. यावेळी मुलीने आरडाओरडा केला. नंतर स्वप्निलने मुलीच्या डोक्यात गोठ्यात पडलेला दगड मारला. तसेच मुलीचा मृतदेह गोठ्यात असलेल्या गुरांच्या चाऱ्यामध्ये लपवून दिला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून तपास सुरू आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.