Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली जिल्ह्यातील हे ' गाव ' आहे जिथे चोरी होत नाही

सांगली जिल्ह्यातील हे ' गाव ' आहे जिथे चोरी होत नाही 


कधीही न चोरी होणारं ठिकाण म्हणून शनिशिंगणापूर बद्दल सर्वांनी ऐकलं असेल. पण महाराष्ट्रात दुसरं एक असं गाव आहे जिथं चोरी सोडाच चुकून वस्तू हरवली तरी ती खात्रीने परत मिळते. आपला विश्वास बसणार नाही पण सांगली जिल्ह्यातील भिलवडी गावाबाबत हे खरं आहे. रोज सकाळी सामूहिक राष्ट्रगीत होणाऱ्या या गावानं प्रामाणिकपणाचा वेगळा आदर्श घालून दिला आहे. विशेष म्हणजे गावात कोणाचीही वस्तू हरवली तर संबंधिताला शोधून ती त्याला प्रामाणिकपणे परत केली जाते.भिलवडी गावातील कौतुकास्पद प्रथासांगली जिल्ह्यातील कृष्णा काठावर वसलेलं भिलवडी हे सुजलाम सुफलाम गाव आहे. पलुस तालुक्यातील जेमतेम 15 हजार लोकसंख्या असणारं हे गाव महापुरामुळं चर्चेत असतं.

2019 आणि 2020 साली आलेल्या महापुरान गावाचं होत ते नव्हत केलं. त्यातच कोरोनाच्या काळात सर्वांची परिस्थितीत अतिशय हलाखीची झाली आणि माणसाच्या जगण्याचं गणितच बदललं. परिस्थितीवर मात करून गावातील काही व्यक्तींच्या पुढाकाराने एक अभिनव उपक्रम गावात सुरू झाला आणि त्याची चर्चा सर्वत्र झाली.गावात होतं रोज राष्ट्रगीतगावात दररोज सकाळी 9 वाजून 10 मिनिटांनी पब्लिक अनाऊंस सिस्टीम द्वारे राष्ट्रगीत वाजवले जाते. ज्यावेळी राष्ट्रगीत सुरू होते त्यावेळी संपूर्ण गाव स्तब्ध होते.

गेल्या तीन वर्षांपासून अखंडपणे हा उपक्रम आजही सुरू आहे. राष्ट्रगीत झाल्यानंतरच गावातील सर्व व्यवहार सुरू होतात. आता या उपक्रमामुळे गावकऱ्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल झालाय.महाराष्ट्रातील 'बुलेटचं गाव' माहितीये का? नावामागं आहे खास कारण, फोटोज प्रामाणिकपणामुळे गाव चर्चेतआता भिलवडी गावाची ओळख ही चोरीला गेलेल्या तसेच हरवलेल्या वस्तू मिळण्याची झाली आहे.

एखादी हरवलेली वस्तू जर गावातील कोणालाही सापडली तर ती मूळ मालकापर्यंत सुखरूप पोहोचते. गावकऱ्यांनी हा नवा पॅटर्न आता रुजू केलाय. एखाद्या व्यक्तीची वस्तू हरवली, चोरीला गेली अथवा सापडली तर पब्लिक अनाउन्समेंट सिस्टीम वरून पुकारले जाते. प्रामाणिकपणे या वस्तू ग्रामपंचायत कार्यालयात जमा करण्यात येतात.

त्यानंतर ओळख पटवून त्या मूळ मालकांना सुपूर्त करण्यात येतात.61 मोबाईलसह किमती वस्तू केल्या परतभिलवडीत हरवलेल्या वस्तू लोकांना व्यवस्थित परत मिळत आहेत. आतापर्यंत महागडे 61 अँड्रॉइड मोबाईल, सहा दुचाकी, ६० हजारांची रोख रक्कम, जेवणाचे डबे, किल्ल्या, एटीएम कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड अगदी खिळे - मोळे सुद्धा नागरिकांना परत मिळाले आहेत. गावात कोणतीही वस्तू हरवली तर आता पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार देण्यापेक्षा प्रथम ध्वनीक्षेपकवर दिली जात असल्याने पोलीस ठाण्यातील तक्रारी कमी झाल्याचे चित्र आहे. या उपक्रमामुळे प्रामाणिकपणाचा नवा आदर्श भिलवडीकरांनी निर्माण केला आहे. तो सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.