Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

लग्नाआधी शरीर संबध ठेवण्यास तरूणीचा नकार; संतापलेल्या तरूणाच भयानक कृत्य!

लग्नाआधी शरीर संबध ठेवण्यास तरूणीचा नकार; संतापलेल्या तरूणाच भयानक कृत्य!


गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिला अत्याचाराच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. प्रेमसंबंध तसेच लग्नाचे वचन देऊन महिलांवर अत्याचार झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहे. अत्याचाराला विरोध केल्यानंतर आरोपींकडून मारहाणीच्या घटनाही घडत आहेत. अशाच काहीसा प्रकार मुंबईतून समोर आला आहे. शरीरसुखाची मागणी नाकारल्याच्या रागातून एका १८ वर्षीय तरुणीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. मुंबईच्या वर्सोवा परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी पीडितेने दिलेल्या फिर्यानुसार, पोलिसांनी २६ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, वर्सोवा परिसरात राहणाऱ्या १८ वर्षीय तरुणीचं २६ वर्षीय तरुणासोबत लग्न होणार होतं. दोघांच्या लग्नाची घरात बोलणी सुरू होती. त्याचवेळी मित्राच्या रूमवरून सामान आणण्याच्या बहाण्याने आरोपी तरुणाने तरुणीला फोन करून बोलावून घेतलं.

दरम्यान, तरुणी रूमवर आल्यानंतर आरोपीने तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरुणीने या सर्व गोष्टीला विरोध केला. त्यामुळे रागाच्या भरात आरोपी तरुणाने तिला बेदम मारहाण केली. इतकंच नाही, तर उशीने तरुणीचं तोंड दाबत तिला जीवे मारण्याचा देखील प्रयत्न केला. याप्रकरणी वर्सोवा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपी तरुणाचा शोध घेत आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.