Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

केंद्रीय मंत्र्यांच्या आईला भररस्त्यात लुटलं, नाशिकमध्ये गुन्हा दाखल

केंद्रीय मंत्र्यांच्या आईला भररस्त्यात लुटलं, नाशिकमध्ये गुन्हा दाखल

नाशिक, 20 ऑगस्ट : नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या मातोश्रीच्या सोन साखळीवर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारती पवार यांच्या आई शनिवारी सायंकाळी भाजीपाला घेऊन पायी घरी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन साखळी ओरबाडली. 

दरम्यान या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, चोरट्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.घटनेबाबत अधिक माहिती अशी की, भारती पवार यांच्या आई शांताबाई बागुल या शनिवारी भाजीपाला खरेदी करून पायी आपल्या घरी जात होत्या. याचदरम्यान त्यांच्या पाठीमागून पांढऱ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी ओरबडली.


त्यानंतर चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. ही घटना सायंकाळी साडेसातच्या सुमारास पेठ रोड परिसरात घडली. दरम्यान या प्रकरणी प्राप्त तक्रारीनुसार म्हसरूळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.घटनेमुळं खळबळ चोरट्यांनी चक्क केंद्रीय मंत्र्यांच्या आईची सोन साखळी हिसकवल्यानं या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.