निर्भीड पत्रकारिता टिकली पाहिजे - राज ठाकरे
पिंपरी: सध्याच्या राजकीय घडामोडींवर पत्रकारांना राग यायला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले, आणि सहा दिवसांनी अजित पवार सत्तेत सहभागी झाले
याचा पत्रकारांना राग येत नाही. पत्रकारांवरील हल्ले निषेधार्ह आहेतच पण निर्भिड पत्रकारिता टिकली पाहिजे. महाराष्ट्र हितावर लिहिले पाहिजे, बोलले पाहिजे, असे परखड मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केल.
आकुर्डी येथील ग. दी. माडगुळकर सभागृहात आयोजित पत्रकार हल्ला विरोधी कायदा परिषदेत ठाकरे बोलत होते. कार्यक्रमास खासदार श्रीरंग बारणे, मनसे नेते अनिल शिदोरे, विद्यार्थी सेनेचे प्रमुख अमित ठाकरे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, शत्रुघ्न काटे, माजी गटनेते राहुल कलाटे, मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, विद्यार्थी सेना प्रदेश उपाध्यक्ष हेमंत डांगे आदी उपस्थित होते.
राज ठाकरे म्हणाले, माझ्या सभेला गर्दी असते पण मते मिळत नाहीत, असे मला पत्रकार विचारतात. 2009 मध्ये 13 आमदार काय मटक्याच्या आकड्यावर निवडून आले होते काय?, लोकसभेला उमेदवारांना लाखांवर मते पडली होती. सत्तेचा अमरपट्टा कोणीही घेऊन आलेला नाही. ज्या दिवशी सत्ता येते, त्या दिवसापासून सत्ता जात असते. सुरुवातीला भाजपचे किती खासदार होते. अटलबिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे यांच्याही मोठ्या सभा होत होत्या. पण, मते किती पडत होती. त्यावेळी कॉंग्रेसशिवाय पर्याय होता का? त्याप्रमाणे प्रत्येकाचा काही काळ असतो.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.