Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अवघ्या तीन हजार रुपयांसाठी तरूणाने गमावला जीव

अवघ्या तीन हजार रुपयांसाठी तरूणाने गमावला जीव

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये गुन्हेगारीच्या घटना वाढतच चालल्या असून त्यामुळे शहरातील नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत. भरबाजारात दिसाढवळ्या एका तरूणावर चाकूने वार केल्याने त्याला जीव गमवावा  लागल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अवघ्या तीन हजार रुपयांसाठी हा हल्ला करण्यात आल्याच समजते.

पीडित तरूणावर आरोपीने 15-20 वेळा चाकूने सपासप वार केले. धक्कादायक गोष्ट म्हणजे हा हल्ला होत असना आजूबाजूच्या लोकांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली होती. कोणीच त्याला वाचवण्यासाठी पुढे आले नाहीत. काळजाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. दिल्लीतील तिगडी भागात बुधवारी सकाळी हा हल्ला झाला. एक युवकावर चाकू हल्ला झाल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. तेथे 21 वर्षीय युसूफ हा युवक रक्ताच्या थारोळ्यात गंभीर अवस्थेत पडला होता.त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तेथेच त्याने अखेरचा श्वास घेतला.

मृत युवकाच्या वडीलांनी दिलेल्या माहितीनुसार, युसूफने काही दिवसांपूर्वी शाहरूख नावाच्या व्यक्तीकडून 3 हजार रुपये उधार घेतले होते. शाहरूख त्याच्याकडे त्या रकमेची मागणी करत होता, तीन-चार दिवसांपूर्वी शाहरूखने त्याला धमकीही दिली होती. मात्र बुधवारी सकाळी शाहरूखने युसूफवर हल्ला केला, त्यात त्याचा मृत्यू झाला. त्याच्यावर चाकूने वार करण्यात आले होते. युसूफच्या वडिलांच्या तक्रारीच्या आधारे आरोपीविरोधात हत्येचा गुव्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील कारवाई करत आहेत.

घटनेचा व्हिडीओ आला समोर

दरम्यान काळजाचा थरकाप उडवणाऱ्या या हल्ल्याचा व्हिडीओही समोर आला आहे. एका दुकानाच्या बाहेर युसूफ रक्तबंबाळ अवस्थेत पडला आहे आणि आरोपी शाहरूख त्याच्यावर चाकूने वार करत असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. आजूबाजूच्या लोकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो थांबला नाही. जमिनीवर पडलेल्या युसूफने त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी झाला.

पण संधी मिळताच इर लोकांनी धावत जाऊन शाहरूखला पकडले आणि त्याच्या हातातून चाकू सोडवून घेतला. त्यानंतर जमावाने त्यालाही बेदम मारहाण केली असून तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.