मिरजेतील घटना; खासगी क्लास चालकाकडून विद्यार्थीनीचा विनयभंग !
मिरज : दहावीचा फायनल पेपर देतो असे सांगून एका खासगी क्लास चालकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला. मिरज शहरातील या एका खासगी क्लासमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी मिलिंद गलांडे (रा. मिरज) याच्याविरुद्ध मिरज शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित विद्यार्थीनी मिरजेतील एका खासगी क्लासमध्ये शिकत आहे. या क्लासमध्ये दि. २४ जुलै रोजी सराव पेपर घेण्यात आला होता. या पेपरसाठी पीडित विद्यार्थीनी देखील बसली होती.
यावेळी पीडितेला इतर मुलां-मुलींसोबत न बसवता संशयित गलांडे याने परीक्षा देण्यासाठी स्वतंत्र बसवले. त्यानंतर पीडितेला तूला दहावीच्या बोर्डाचा फायनल पेपर देतो असे सांगून तिच्याशी अश्लील वर्तन करून तिचा विनयभंग केला, असे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार मिरज शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.