Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गृहखात्याचा वचक कुठेही दिसत नाहीये; सुप्रिया सुळेंची देवेंद्र फडणवीसांवर टीका

गृहखात्याचा वचक कुठेही दिसत नाहीये; सुप्रिया सुळेंची देवेंद्र फडणवीसांवर टीका

सातारा जिल्ह्यातील माण येथे एका महिलेवर भर रस्त्यात मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याप्रकरणी अनेकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

गृहखात्याचा वचक कुठेही दिसून येत नाही, असं म्हणतं सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ट्विट करत सुप्रिया सुळे म्हणाल्या, “माण, सातारा येथे महिलेला भररस्त्यात लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ माध्यमातून पाहण्यात आला. हा व्हिडिओ अतिशय संतापजनक आणि दुर्दैवी आहे.


गृहखात्याचा वचक कुठेही दिसून येत नाही. त्यामुळे महिलांवर अत्याचार करणाऱ्या प्रवृत्ती निर्ढावल्या आहेत.राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी गृहमंत्र्यांनी आपल्या खात्याकडे लक्ष देणे खुप गरजेचे आहे. महिलांना अशाप्रकारे मारहाण करणाऱ्या व्यक्तीवर तातडीने कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.”

दरम्यान, या व्हिडिओमध्ये एक महिला रस्त्यावर पडलेली दिसत आहे. या व्हिडिओमध्ये काही पुरुष त्या महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण करताना दिसले आहे. भर चौकामध्ये ही घटना घडलेली दिसत आहे. हे प्रकरण सुरू असताना आजूबाजूला अनेक लोकं जमलेली दिसत आहे. मात्र, त्या महिलेवर होणारा अत्याचार थांबवण्यासाठी कोणीही पुढे न आल्याचं दिसून आलं आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.