राष्ट्रवादीच्या 'या' आमदाराला जीवे मारण्याची धमकी
तिरुवनंतपुरम : केरळमधील काँग्रेसच्या नेतृत्वाखालील 'युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट'ने बुधवारी सत्ताधारी डावे सरकार आणि राज्य पोलिसांवर उदासीन वृत्ती अवलंबल्याचा आरोप केला. राष्ट्रवादीचे आमदार के. थॉमस यांना त्यांच्याच पक्षाकडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
यावर यूडीएफ विरोधकांनी सत्ताधारी डावे सरकार आणि राज्य पोलिसांना घेरले. यूडीएफ विरोधकांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला. आमदाराची तक्रार राज्याच्या पोलिस प्रमुखांना 7 ऑगस्ट रोजी प्राप्त झाली असून, तपास सुरू करण्यात आला आहे. त्यांची पुरेशी सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी पोलिसांनीही पावले उचलली आहेत. तक्रारीनंतर या पक्षाच्या कार्यकारिणीतून काढून टाकण्यात आलेल्या थॉमस यांनीही पोलिस किंवा सरकारविरोधात कोणतीही तक्रार नसल्याचे सांगितले. दरम्यान, माझा पोलिस आणि सरकारवर विश्वास असल्याचे राष्ट्रवादीचे आमदार विधानसभेत म्हणाले. सभागृह तहकूब करून या विषयावर चर्चा करू न दिल्याने यूडीएफ विरोधकांनी सभात्याग केला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.