Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दारूबंदीसाठी महिलांचा ग्रामपंचायतीवर लाठी मोर्चा

दारूबंदीसाठी महिलांचा ग्रामपंचायतीवर लाठी मोर्चा 


दारू विक्रेत्यावर पोलिस कारवाई होते मात्र पुन्हा दारूविक्री जोरात सुरू होते. या प्रकाराला वैतागून संतप्त महिलांनी बुधवारी रात्री उशिरा मुख्य रस्त्याने घोषणा देत दारू विक्रेत्याच्या घरावर लाठी मोर्चा काढण्यात आला. तालूक्यातील वडवळ नागनाथ येथे मागील काही महिन्यांपासून येथे अवैध दारू विक्रेत्यांचा हैदोस वाढल्याने गोरगरीब, मजुरांच्या संसाराची राख रांगोळी होत आहे.

आंदोलनानंतर घटनास्थळी पोलीस आले परंतु दारूच्या बाटल्या काही अढळून आल्या नाहीत. दारू विक्रेत्याला ताब्यात घेत समज देऊन गुरुवारी पहाटे सोडून दिले. अलीकडे गावात काही ठिकाणी देशीसह विदेशी दारू सहजपणे मिळत असल्याने मद्यपींची संख्याही वाढली आहे. पुरुष मंडळीकडून मद्यपान सेवन करून अत्याचार होत असल्याने गावातील महिला (रणराघीनी) दारू बंदी साठी सरसावल्या आहेत. गावात मुख्य रस्त्यावर तसेच प्रत्येक चौकात तळीराम हैदोस घालताना दिसत असून, याचा येथील व्यापारी, महिला, नोकरदार, विद्यार्थ्यांसह सामान्य नागरिकांना त्रास होत आहे. याबाबत तक्रारींचे प्रमाणही वाढले आहे.

दरम्यान, गुरुवारी सकाळी गावातील एका भागात दारू विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या माया सोरटे यांच्या नेतृत्वाखाली संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीत ठिय्या मांडला. यावेळी चाकूरचे पोलीस निरीक्षक साहेबराव नरवटे यांच्या आदेशानुसार उपनिरीक्षक कपिल पाटील, बीट जमादार गोंिवद बोळंगे, रवी वाघमारे यांनी येत्या चार दिवसांत येथील अवैद्य दारूविक्री आणि मटका पूर्णता बंद केला जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर उपस्थित महिला घरी परतल्या.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.