Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दूध उत्पादन १४ करोड लिटर आणि विक्री तब्बल ६४ करोड लिटर !

दूध उत्पादन १४ करोड लिटर आणि विक्री तब्बल ६४ करोड लिटर !


महाराष्ट्रात रोज १४ करोड लिटर दूध उत्पादन होते. मात्र त्याच महाराष्ट्रात रोज ६४ करोड लिटर दूधाची विक्री केली जाते. ही खुप मोठी धक्कादायक बाब आहे. हे बाकीचे ५० करोड लिटर दूध येतं कुठून? आपण रोज पिशवीतील दूध पित आहोत, ते दूध पित आहोत का? विष पित आहोत? चौकाचौकात चहा विकला जातो, साधा चाय, ब्रॅण्ड चाय तो यहा आहे का स्लओपॉयझन नागरिकांनो? दूधाचा चहा पिऊन आज भारतातील २० टक्के लोक अपचन व बद्धकोष्ठतेचे शिकार आहेत. अनेक जण या चहामुळेच पित्त, डोकेदुखी, निद्रानाशाने त्रस्त आहेत. तो वेगळाच विषय आहे. स्वतः डॉक्टरच चहाचा व्यसनी बनल्यावर, चहा पिऊ नका, असं नागरिकांना कोण सांगणार? आणि आपण झोपेतून जागं कधी होणार? परंतु माझ्या सुजाण नागरिकांनो ही झोप तुम्हाला खुपच महागात पडू शकते. कारण जागतिक आरोग्य संघटनेने इशारा दिला आहे की, जर भेसळयुक्त पदार्थावर आळा नाही घातला तर ८० टक्के लोकांना कॅन्सर होऊ शकतो. 

जो शेतकरी जीवाच रान करुन जनावरं सांभाळतो. देशाला शुद्ध दूध देतो, त्याच्या दूधाला दर कमी द्यायचा अन् दुसरीकडे रासायन मिसळून भेसळयुक्त दूध मिनीटात बनवून लोकांचं आरोग्य धोक्यात पालणारी व्यवस्था तेच सरकारी अधिकारी, नोकरदार आणि तोच भ्रष्टाचार यांना प्रश्न कोण विचारणार नागरिकांनो? भेसळयुक्त दूध विकणारे रोज करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करीत आहेत. भ्रष्टाचार सोडा पण नागरिकांकडून पैसे घेऊन त्यांनाच विष पाजत आहेत. १४ करोड कुठं? आणि ६४ करोड कुठे? कोठे मेळ बसतोय का? आता विचार करा, तुम्ही जे रोज पिशवीतील दूध पित आहात, ते शुद्ध दूध आहे का? भेसळयुक्त दूध आहे? आजच सावध व्हा! नायतर पुन्हा वेळ निघून गेलेली असेल. भेसळयुक्त पदार्थापासून सावध रहा.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.