सासऱ्यांसोबत झालं जोरदार भांडण, संतापलेल्या सुनेने त्यांना बाल्कनीतून सरळ..
राजस्थानच्या जयपूरमध्ये एक हसतंखेळतं कुटुंब क्षणार्धात उद्धवस्त झालं. तेथे एका उद्योगपतीचा संशयास्पद परिस्थितीमध्ये मृत्यू झाला आहे. बाल्कनीतून खाली पडल्याने ते मरण पावले. लतेश गोयल असे मृत इसमाचे नाव असून त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा हनी याने त्याची पत्नी स्वाती हिच्यामुळेच वडिलांचा मृत्यू झाल्याचा आरोप लावला आहे. स्वातीने आपल्या वडिलांना बाल्कनीतून खाली धक्का दिला असे त्याचे म्हणणे असून सध्या पोलिसांनी स्नेहाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
रिपोर्टनुसार, हनी याची आई आणि बहीण या दोघींचाही आधीच एका रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. हनी व स्नेहा यांचे नव्ह मॅरेज झाले होते, त्याच्या वडिलांनीच दोघांचे लग्न लावून दिले होते. मात्र वडिलांच्या मृत्यूनंतर हनी याने व्हिडीओ जारी करत पत्नीवरच वडिलांच्या हत्येचा आरोप लावला आहे.
या व्हिडीओमध्ये त्याने सांगितले होते की, 11 ऑगस्ट रोजी सकाळी मृत लतेश गोयल आणि स्नेहा यांच्यादरम्यान वाद झाला होता. त्यानंतर संतापलेल्या स्नेहाने त्यांना बाल्कनीतून खाली धक्का दिला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारांदरम्यान 12 ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर पत्नी स्नेहा ही सर्व दागिने आणि रोख रक्कम घेऊन फरार झाली, असा आरोपही हनी याने केला आहे.मात्र त्यानंतर त्याच्या पत्नीचे कुटुंबिय घरी येऊन वाद घालू लागले. तर स्नेहा हिनेही पोलिसांकडे जाऊन हुंडा मागितल्याची तक्रार नोंदवली. एफआयआर झाल्यानंतरच पुढील कारवाई होईल. काही वर्षांपूर्वीच पत्नी व मुलीचा झाला होता मृत्यूजयपूरच्या जयसिंहपूर येथे मृत लतेश गोयल यांचे कुटुंब सुखाने रहात होते, त्यांचा हँडीक्राफ्टचा बिझनेस होता. मात्र 2011मध्ये लतेश गोयल यांची पत्नी व मुलीचा एका अपघातात मृत्यू झाल्यान ते हादरले. काही दिवसांनी या दु:खातून बाहेर येऊन लतेश व त्यांचा मुलगा हनी जगू लागले. त्यानंतर सहा महिन्यांपूर्वी फेब्रुवारी 2023 मध्ये हनी व स्नेहा यांचे लव्ह मॅरेज झाले.
सून आल्यामुळे सर्व काही ठीक होईल असं लतेश यांना वाटलं, पण उलट सून त्यांच्याशीच वाद घालू लागली. यामुळे ते दु:खी झाले आणि दारू पिऊ लागले. घटनेच्या दिवशीदेखील स्नेहा व त्यांचा काही कारणावरून वाद झाला आणि तिने त्यांना बाल्कनीतून खाली धक्का दिला. पोलिस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.