बॅलन्स नसताना मिळतील पैसे! हे खाते आहे का तुमच्याकडे
नवी दिल्ली : पंतप्रधान जन धन योजनेत बँक खाते उघडले जाते. या खात्यात खातेदाराला अनेक बँकिग सुविधा मिळतात. यामध्ये चेक बुक, पासबुक, अपघात विमा अशा सुविधा मिळतात.
पंतप्रधान जनधन योजनेच्या खात्यात रक्कम नसली तरी तुम्हाला 10 हजार रुपयांच्या ओव्हरड्राफ्टची सुविधा देण्यात आली आहे. 2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनधन योजनेची घोषणा केली होती. त्यावर्षी 28 ऑगस्ट रोजी ही योजना सुरू करण्यात आली. खातेदाराला खात्यात पैसे नसतानाही ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळते. त्याला खात्यातून पैसा काढता येतो.
ओव्हरड्राफ्टची सुविधा
जन धन योजनेत झिरो बॅलेन्सवर खाते उघडता येते. या खात्यात खात्यात कमीत कमी बॅलेन्स ठेवण्याची गरज नाही. तुमच्या खात्यात मिनिमम बॅलन्स ठेवण्याची गरज नाही. त्यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही, दंड ही देण्यात येत नाही.
ओव्हरड्राफ्टची मर्यादा किती?
जन धन खात्यात शिल्लक नसेल तरी ग्राहकाला, खातेदाराला 10 हजार रुपयांच्या ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळते. पण त्यासाठी एक अट आहे. जन धन खाते उघडून कमीत कमी सहा महिने झालेले असणे आवश्यक आहे. तितके जुने तुमचे खाते असावे. त्यानंतर तुम्हाला गरज असेल तेव्हा 10,000 रुपये ओव्हरड्राफ्ट रुपाने मिळविता येतात. तर खाते उघडल्यानंतर लागलीच 2000 रुपयांचा ओव्हरड्राफ्ट काढता येतो.
मिळतात या सुविधा
जन धन योजनेतंर्गत 10 वर्षाखालील मुलालाही खाते उघडता येतेरुपे एटीएम कार्ड, 2 लाख रुपयांचे अपघात विमा संरक्षण मिळते30 हजार रुपयांचा आयुर्विमा आणि ठेवींवरील व्याज मिळते10 हजारांच्या ओव्हरड्राफ्टची सुविधाही मिळतेपीएम जनधन खाते कोणत्याही बँकेत उघडता येतेखात्यात शिल्लकी ठेवण्याची गरज नाही. बॅलन्स नसले तरी खाते एक्टीव्ह राहतेयोजनेत केला होता बदलया योजनेचे यश पाहून केंद्र सरकारने2018 मध्ये अधिक सुविधा आणि लाभांसह ही योजना पुन्हा नव्याने सादर केली. या योजनेत कोणताही भारतीय नागरीक खाते उघडू शकतो.
कोणती कागदपत्रे गरजेची
खाते उघडण्यासाठी आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक आहे.
यापैकी एकही पुराव नसला तरी खाते उघडता येते. बँक अधिकाऱ्यासमोर सेल्फ अटेस्टेड फोटो आणि स्वाक्षरी करुन खाते उघडता येते. खाते उघडण्यासाठी कुठलेही शुल्क नाही. कसे उघडता येईल खाते भारतीय नागरिकाना कोणत्या बँकेत जाऊन खाते उघडता येते बँकेच्या सेवा केंद्रात पण हे खाते उघडता येते खाते उघडण्यासाठी एक अर्ज भरावा लागतो मोबाईल क्रमांक, बँकेचे व ब्रँचचे नाव, अर्जदाराचा पत्ता असा तपशील द्यावा लागतो
बँकेतील सामान्य खाते जन धन खात्यात हस्तांतरीत करता येते
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.