मोठी बातमी! जयंत पाटील यांच्या भावाला ईडीची नोटीस
पुणे, 13 ऑगस्ट : मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भावाला ईडीने नोटीस पाठवल्याची माहिती मिळत आहे. जयंत पाटील यांचे बंधू जयसिंगराव पाटील यांना ईडीनं नोटीस पाठवली आहे.
जयसिंगराव पाटील हे मुंबईतील बडे हॉटेल व्यावसायिक आहेत. दरम्यान जयंत पाटील यांच्या आणखी काही निकटवर्तीयांना देखील ईडीकडून नोटीस आल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच जयंत पाटील यांना देखील एका प्रकरणात ईडीकडून नोटीस आली होती. त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते.
कारण अस्पष्ट जयसिंग पाटील हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे बंधू आहेत. त्यांचा मुंबईमध्ये हॉटेलचा मोठा व्यवसाय आहे. त्यांना ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र ही नोटीस नेमकी कोणत्या प्रकरणात पाठवण्यात आली याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाहीये.
जयंत पाटील यांच्या निकटवर्तीयांना देखील ईडीकडून नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी केल्यानंतर पक्षात दोन गट पडले. जयंत पाटील हे शरद पवार यांच्या गटासोबत आहेत. ते शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. तर दुसरीकडे अजित पवार यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनिल तटकरे यांची नियुक्ती केली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे पुणे दौऱ्यावर असताना जयंत पाटील त्यांना भेटल्याचे वृत्त समोर आलं होतं. या वृत्तानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. मात्र जयंत पाटील यांनी हे वृत्त फेटाळून लावलं. आपण शाह यांना भेटलो नसल्याचा खुलासा त्यांनी केला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.