Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यास तीन वषार्ची शिक्षा

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यास तीन वषार्ची शिक्षा


सांगली:  अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकाला तीन वषार्चा सश्रम कारावास, १५ हजार रूपये दंड व दंड न दिल्यास तीन महिन्यांची कैद अशी शिक्षा सुनावण्यात आली. सांगलीतील जिल्हा व जादा सह सत्र न्यायाधीश डी. एस. हातरोटे यांनी गुरुवारी हा निकाल दिला. सरकारपक्षातफेर् जिल्हा सरकारी अभियोक्ता अनिता कदम यांनी काम पाहीले. 

रशिद आयुब जमादार (वय ३५, रा. दुधगाव, ता. मिरज) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. पीडित अल्पवयीन मुलगी घराजवळ खेळत असताना तसेच ती घरात एकटी असताना जमादार याने तिला घरात बोलावले. त्यानंतर तिचा विनयभंग केला. पीडित मुलीने जमादार हा खराब आहे अशा आशयाची चिठ्ठी स्वतः लिहिली होती. हा प्रकार पीडित मुलीने तिच्या आईला सांगितला. त्यानंतरही त्याने अनेकवेळा पीडित मुलीचा वारंवार विनयभंग केला. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने याबाबत सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. 

पोलिसांनी याचा कसून तपास करत न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या खटल्याच्या सुनावणीवेळी एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. घटनास्थळाचा पंचनामा, चिठ्ठी जप्तीचा पंचनामा, पीडितेचा तसेच तिच्या आईचा जबाब आणि साक्षीदारांच्या साक्षींचा विचार करून न्या. हातरोटे यांनी जमादार याला दोषी धरून त्याला शिक्षा सुनावली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.