Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गहाळ झालेले तीन लाखांचे तब्बल २१ मोबाईल केले परत विटा, सायबर पोलिसांची संयुक्त कारवाई

गहाळ झालेले तीन लाखांचे तब्बल २१ मोबाईल केले परत विटा, सायबर पोलिसांची संयुक्त कारवाई


सांगली :  खानापूर तालुका तसेच विटा परिसरातून गहाळ झालेले तीन लाख १२ हजारांचे २१ मोबाईल संबंधितांना परत करण्यात आले. सांगलीतील सायबर पोलिस ठाण्याच्या मदतीने विटा पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही कारवाई केल्याची माहिती पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली. 

गेल्या सहा महिन्यांत खानापूर तालुका तसेच विटा शहर परिसरातून प्रवासादरम्यान तसेच अन्य कारणाने अनेक मोबाईल गहाळ झाले होते. विट्यात प्रवासादरम्यान मोबाईल झाल्याची फिर्याद रमेश बाबुलाल कुमार (रा. विटा) यांनी विटा पोलिस ठाण्यात दिली होती. त्यानुसार पोलिस ठाण्यात गहाळ मोबाईलच्या नोंदी पाहून सर्व मोबाईल हस्तगत करण्याचे आदेश निरीक्षक डोके यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिले होते. 

विटा पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सांगलीतील सायबर पोलिस ठाण्याची मदत घेत या सर्व प्रकरणांचा तांत्रिक माहिती उपलब्ध करून घेतली. त्यानंतर गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेऊन कुमार यांचा मोबाईल हस्तगत करण्यात आला तसेच अन्य २० मोबाईलही हस्तगत करण्यात आले. हे सर्व मोबाईल संबंधितांना परत करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली. 

विट्याचे पोलिस निरीक्षक संतोष डोके, सायबरचे निरीक्षक संजय हारूगडे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम माळी, अमोल कराळे, हेमंत तांबेवाघ, प्रमोद साखरपे, महेश देशमुख, महेश संकपाळ, अक्षय जगदाळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.