प्रकाशक अरविंद पाटकर यांची शनिवारी मुलाखत व सत्कार
सांगली दि.१७: गेली पाच दशके मराठी साहित्यक्षेत्रात 1000 पेक्षा अधिक लोकप्रिय अनमोल ग्रंथांची भर घालणाऱ्या मनोविकास प्रकाशन संस्थेचे संस्थापक संचालक अरविंद पाटकर यांच्या सत्तरी निमित्त त्यांची प्रकट मुलाखत व त्यांचा सत्कार सांगली जिल्हयातील लेखक वाचक चळवळीतील विविध संस्थाच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.शनिवार दिनांक 19 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी साडेचार वाजता श्वास हॉस्पिटलचे सभागृह,सिव्हिल हॉस्पिटलमागे, सांगली येथे होणार आहे .या कार्यक्रमात ज्येष्ठ समीक्षक प्रा.अविनाश सप्रे आणि पुस्तक चळवळीत मोलाचे योगदान असलेले अरुण नाईक हे ही विशेष मुलाखत घेणार आहेत. मनोविकास प्रकाशनाच्या वतीने अच्युत गोडबोले ,जयंत नारळीकर,नंदा खरे ,डॅा तारा भवाळकर,दलाई लामा,निरंजन घाटे अशा अनेक नामवंत लेखकांची पुस्तके प्रकाशित करण्यात आली आहेत.
यावेळी सांगलीतील विविध साहित्य सांस्कृतिक संस्थांच्या वतीने समीक्षक व शिवाजी विद्यापीठ वाङमय मंडळाचे अध्यक्ष प्रा.डॉ. रणधीर शिंदे यांच्या शुभहस्ते व डॉ .तारा भवाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पाटकर यांचा सत्कार करण्यात येणार आहे.या कार्यक्रमासाठी साहित्य रसिकांनी तसेच लेखक व वाचक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांच्यावतीने डॉ. अनिल मडके, महेश कराडकर, अभिजीत पाटील यांनी केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.