सॅनिटरी पॅडवरून पोलिसांनी लावला खुन्यांचा छडा !
अहमदनगर : खुनाच्या गुन्ह्यात कोणताही पुरावा नसताना अहमदनगर पोलिसांनी चक्क एका सॅनिटरी पॅडवरून संशयितांचा शोध घेतला आहे. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील दुर्गम भागात एका अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला होता. या महिलेची ओळख पटवण्यासोबतच तिचा खून करणाऱ्या आरोपीचा पोलिसांनी छडा लावला आहे. चक्क एका सॅनेटरी पॅडवरून पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. क दिवसांपूर्वी अहमदनगरच्या राजूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या 'कातळापूर परीसरात एका 25 वर्षीय महिलेचा मृतदेह काही दिवसांपूर्वी पोलीसांना आढळून आला होता. महिलेचा खून झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. या मृतदेहाची ओळख पटली नव्हती. यानंतर पोलिसांनी या महिलेचा मृतदेह ताब्यात घेवून तो शवविच्छेदनासाठी पाठवला. तिचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर तिची हत्या झाल्याचे तपासात समोर आले. या महिलेचा जेव्हा मृतदेह सापडला तेव्हा त्या मृतदेहाजवळ पोलीसांना पर्समध्ये सॅनिटरी पॅड सापडले. यावरुन पोलिसांनी तपास सुरु केला. ही महिला राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील असून या महिलेचे नाव कल्याणी महेश जाधव असल्याचे तपासात समोर आले. यानंतर जिल्हा परिषदेच्या मदतीने पोलीसांनी या महिलेच्या घराता पत्ता तसेच इतर माहिती मिळवली. यानंतर पोलिसांनी थेट महिलेच्या घरी जाऊन तिच्या पतीची चौकशी केली.
या महिलेच्या पतीने सुरुवातीला पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर त्याने पत्नीच्या खुनाची कबुली दिली. पत्नीवर असलेल्या अनैतिक संबधाच्या संशयावरून त्याने आणि त्याचा भाचा मयूर साळवे यांनी खुन केल्याचे कबुल केले. यानंतर पोलिसांनी दोन्ही संशयितांना या प्रकरणी अटक केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.