शरीरात प्लेटलेट्सची संख्या कमी झाल्यानंतर दिसून येतात 'ही' लक्षणं
फीट आणि फाईन राहणं प्रत्येकाला आवडतं. चांगलं आरोग्य राहण्यासाठी तुमच्या शरीरात प्लेटलेट्सची संख्या पूर्ण असणं गरजेचं आहे. जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरात प्लेटलेट्सची संख्या कमी असेल तर व्यक्तीला अनेक परिणामांचा सामना करावा लागतो.
प्लेटलेट्स या अशा ब्लड सेल्स असतात, ज्या ब्लिडींग रोखण्यास मदत करतात. प्लेटलेट्सचं काम शरीरात ब्लड क्लॉट्स बनवण्याचं काम करतात. यावेळी जर रूग्णाला दुखापत झाली तर अधिक रक्तस्त्राव होत नाही. ज्या रूग्णाच्या शरीरात प्लेटलेट्सची संख्या कमी असते, त्यांना थ्रोम्बोसायटोपेनिया या आजाराचा सामना करावा लागतो. त्यामुळे हा आजार टाळयचा असेल तर प्लेटलेट्स कमी होण्याचे संकते आपण जाणून घेतले पाहिजेत.
प्लेटलेट्स काऊंट म्हणजे काय?
प्लेटलेट्स या रंग नसलेल्या रक्तपेशी असतात. या रक्तपेशी रक्त गोठण्यास महत्त्वाची भूमिका बजावतात. ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला दुखापत होते तेव्हा या रक्तपेशी एकमेकांत मिसळतात. याचा परिणाम म्हणजे दुखापत झाल्यानंतर जो रक्तप्रवाह होतो तो थांबण्यास मदत होते.
नॅशनल हार्ट, लंग अँड ब्लड इन्स्टिट्यूटच्या मते, प्रौढांच्या रक्तातील प्लेटलेट्सची श्रेणी प्रती मायक्रोलिटर 150,000 ते 450,000 प्लेटलेट्स असते. जर रक्तातील प्लेटलेटची संख्या प्रती मायक्रोलिटर 150,000 च्या खाली असते त्यावेळी त्याची गणना कमी प्लेटलेट्समध्ये केली जाते.
प्लेटलेट्सची संख्या कमी झाल्यावर दिसून येणारी लक्षणं
नाकातून रक्तस्राव होणं
हिरड्यांमधून रक्त येणं
लघवी करताना रक्त येणं
महिलांना पिरीयड्स दरम्यान जास्त स्राव होणं
चेहऱ्यावर निळ्या रंगाचे चट्टे येणं
शौच्यादरम्यान रक्त जाणं
ज्यावेळी एखाद्या रूग्णाच्या शरीरात प्लेटलेट्सची संख्या कमी होते, त्यावेळी डाएटच्या माध्यमातून तुम्ही ही संख्या वाढवू शकता. यावेळी डाएटमध्ये विटामिन्स आणि मिनरल्सची संख्या वाढवली पाहिजे. हेल्दी ब्लड सेल्ससाठी फोलेट किंवा व्हिटॅमिन बी 9 खूप गरजेचं असतं. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या मते, एका प्रौढ व्यक्तीला दिवसाला 400 मायक्रोग्राम फोलेटची आवश्यकता असते. खाली दिलेल्या पदार्थांमधून तुम्हाला मिळू शकतं फॉलिक
एसिड-
हिरव्या भाज्या
चवळी
तांदूळ
यीस्ट
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.