Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते एपीआय रविराज फडणीस यांना उत्तम जीवन रक्षा पदक प्रदान

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते एपीआय रविराज फडणीस यांना उत्तम जीवन रक्षा पदक प्रदान


कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील कुरूंदवाड पोलिस ठाण्याचे प्रभारी, सहाय्यक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस यांना राष्ट्रपतींकडून प्रजासत्ताक दिनाच्या पूवर्संध्येला उत्तम जीवन रक्षा पदक जाहीर करण्यात आले होते. मंगळवारी कोल्हापूर येथे झालेल्या स्वातंत्र्यदिनाच्या समारंभात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याहस्ते त्यांना ते पदक प्रदान करण्यात आले. दीड लाख रूपये रोख, सन्मानचिन्ह, पदक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
 

३० नोव्हेंबर २०२१ रोजी मिरजेतील औद्योगिक वसाहतीतील केमीकल कारखान्याला आग लागली होती. त्यावेळी सहाय्यक निरीक्षक फडणीस यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तिघांचे प्राण वाचवले. आगीच्या लोटांमध्ये फसलेल्या या लोकांना स्वतःच्या जीवाची पवार् न करता त्यांनी वाचवले होते. यामध्ये ते भाजून गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या या धाडसी कामगिरीची दखल घेत महाराष्ट्र शासनाकडे त्यांना पदक देण्यासंदभार्त प्रस्ताव पाठवला होता. श्री. फडणीस यांच्या कायार्ची दखल घेत त्यांना उत्तम जीवन रक्षा पदक जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्रातून केवळ श्री. फडणीस यांनाच हे पदक जाहीर करण्यात आले होते.  

मंगळवारी कोल्हापुरातील मुख्य ध्वजारोहणाच्या कायर्क्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कायर् केलेल्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी श्री. फडणीस यांना उपमुख्यमंत्र्यांच्याहस्ते पदक प्रदान करण्यात आले. यावेळी माजी मंत्री, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 

सहाय्यक निरीक्षक फडणीस राज्याच्या पोलिस दलात २०११ मध्ये पोलिस उपनिरीक्षक म्हणून दाखल झाले. त्यानंतर रत्नागिरी, सिंधुदुगर्, कोल्हापूर आदी जिल्ह्यात सेवा बजावली. सांगली जिल्ह्यात २०१९ मध्ये सेवेत रूजू झाले. त्यानंतर त्यांनी सांगली एलसीबी, मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याचे प्रभारी म्हणून काम केले. सध्या कुरूंदवाड पोलिस ठाण्यात प्रभारी म्हणून कायर्रत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.