जगभरात मुद्दामून सोडण्यात आलेत एक अब्ज डास; बिल गेट्स यांनी दिली माहिती
ब्रिटनमधील बायोटेक ऑक्सिटेक कंपनीने सुपर मॉक्सिटो म्हणजेच डास तयार केले आहेत. यातील तब्बल 1 अब्ज डास जगभरात सोडण्यात आले आहेत. अशी माहिती समोर आली आहे. पावसाळा म्हण्टलं की डास अस्वच्छता त्यामुळे होणारे आजार डोकं वर काढतात.
पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया हे आजार मोठ्या प्रमाणात बळावतात. पावसाळ्यात साचलेल्या पाण्यामुळे डास होण्याची समस्या सामान्य असते. डास पळवून लावण्यासाठी आपण विविध प्रकारचे प्रयत्न करतो. मात्र, आता डास आणि त्यापासून होणाऱ्या आजाला पूर्णपणे नष्ट करण्यासाठी ब्रिटनमधील बायोटेक ऑक्सिटेक कंपनीने सुपर मॉक्सिटो म्हणजेच डास तयार केले आहेत. हे डास मलेरियाला कायमचं संपवतील असा कंपनीचा दावा असून, अब्जाधीश बिल गेट्स यांनीही त्यांना पाठिंबा दिला आहे. इतकंच नाही तर असे एक अब्ज डास जगभरात सोडण्यात आले आहेत.
मानवनिर्मीत डास
बिल गेट्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, युकेमधील बायोटेक ऑक्सिटेक कंपनीने सुपक मॉस्किटो तयार केले आहेत, जे आजार पसरवणाऱ्या डासांशी लढण्यास सक्षम आहेत. हे सर्व डास नर आहेत. हे डास मादींना संतती होऊ नये यासाठी विशेष जनुक धारण करतात. मादी डास चावल्याने मलेरिया होतो. जर Oxitec ने तयार केलेले डास मादी डासांची सर्व अपत्ये मारतील. तर नव्याने डास निर्माण होणार नाही. त्यामुळे
डासांची पैदासच बंद होईल आणि यामुळे आजार टाळता येतील. मानवनिर्मित हे डास हवामान किंवा मानवासाठी कोणताही धोका निर्माण करत नाही. आतापर्यंत जगभरात एक अब्जाहून अधिक डास सोडण्यात आले आहेत, अशी माहितीही बिल गेट्स यांनी दिली.
डेंग्यूमुळे जगभरात अनेक मृत्यू
डासांची समस्या कोणत्या एका देशाची नाही आहे. जगभरात डासांची समस्या भेडसावते. डास चावल्याने डेंग्यू होऊन दरवर्षी अनेक लोकांचा मृत्यू होतो. डासमुळे होणारे हे आजार संपवायचे असेल आणि हा आजार जगातून पूर्णपणे नष्ट करायचं असेल तर नवी साधनं आणि कल्पनांची आवश्यकता असल्याचं मत बिल गेट्स यांनी यावेळी व्यक्त केलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.