Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बेकायदा मद्य पिण्यास परवानगी देणाऱ्या १० हॉटेल, ढाब्यांवर कारवाई

बेकायदा मद्य पिण्यास परवानगी देणाऱ्या १० हॉटेल, ढाब्यांवर कारवाई

४५ मद्यपींना न्यायालयाकडून दंड ढाबा चालकांवरही गुन्हा, टेबल खुचीर् जप्त

सांगली:  सांगली, मिरजेतील परमिट रूम, बिअर बारचा परवाना नसलेल्या तब्बल १० हॉटेल, ढाबे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये ४५ मद्यपींना न्यायालयाने दंड ठोठावला असून काही ढाबा चालकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर एका ढाब्यावरील टेबल, खुच्यार्, दारूच्या बाटल्या असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्कच्या सांगलीतील भरारी पथकाने ही कारवाई केली आहे. 

मिरज-पंढरपूर रस्त्यावरील हॉटेल टॅप ईन टाऊन, हॉटेल टोमॅटो, हॅटेल अषज्ञ, मिरजेतील कृष्णा घाट रस्त्यावरील हॉटेल मैत्री, सिद्धीविनायक हॅस्पिटलमागील हॅटेल कृष्णा, हरिपूर येथील हॉटेल कृष्णा, धामणी येथील हॉटेल सम्राट, हरिपूर येथील हॉटेल गरम मसाला, मिरज-कुपवाड रस्त्यावरील हॉटेल वैशाली या हॉटेल, ढाब्यांचा कारवाईमध्ये समावेश आहे. धामणी येथील हॉटेल सत्यमवर कारवाई करून तेथील टेबल, खुच्यार् तसेच दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी सत्यम हॉटेलचे मालक दामोदर खोत, शोभा खोत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

दरम्यान या सर्व हॉटेलमध्ये मिळून ३८ मद्यपींवर गुन्हा दाखल करून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना शंभर रूपयांपासून एक हजार रूपयांपयर्त दंड भरण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. दरम्यान यातील धामणी येथील सत्यम हॉटेलमध्ये मद्यपान करताना सापडलेल्या सातजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यासह ढाबा चालकांविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.  राज्य उत्पादन शुल्कचे विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर, सांगलीचे अधीक्षक प्रदीप पोटे यांच्या मागर्दशर्नाखाली भरारी पथकाचे निरीक्षक राजकुमार खंडागळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.