अनिकेत कोथळेच्या खुनाच्या घटनेवेळी आरोपी कॉन्स्टेबल मुल्ला घटनास्थळी प्रत्यक्ष हजर होता.
तपासअधिकारी "मुकुंद कुलकर्णी"
सांगली: बहुचर्चित अनिकेत कोथळे खून प्रकरणातील तपास अधिकारी मुकुंद कुलकर्णी यांची या प्रकरणातील एक आरोपी बडतर्फ कॉन्स्टेबल नसरुद्दीन बाबूलाल मुल्ला याचे वकील एडवोकेट गिरीश तपकीरे यांनी उलट तपासणी घेतली. अनिकेत कोथळे याला पोलीस कोठडीत मारहाण करण्यात आली या मारहाणीत तो मृत्यू पावला ही घटना जेव्हा घडली तेव्हा या प्रकरणातील एक आरोपी बडतर्फ कॉन्स्टेबल नसरुद्दीन मुल्ला हा त्याला दिलेल्या सांगलीतील सराफ कट्टा येथे कर्तव्यासाठी नेमलेल्या पॉईंटवर हजर असल्याचा दावा त्याचे वकील तपकिरे यांनी केला तेव्हा तपास अधिकारी कुलकर्णी यांनी तो त्या जागेवर कर्तव्यावर हजर नव्हता असे स्पष्ट केले.
तपास अधिकारी कुलकर्णी यांची आज उलट तपासणी पूर्ण झाली. बडतर्फ कॉन्स्टेबल मुल्ला याचे वकील तपकिरे यांनी कुलकर्णी यांची उलट तपासणी घेतली. उलट तपासणी दरम्यान तपकिरे यांनी स्टेशन डायरी, आरोपी ने-आण रजिस्टर, हजेरी रजिस्टर, लॉक अप रजिस्टर यासारख्या महत्त्वाच्या रजिस्टर्स मधील नोंदींच्या अनुषंगाने कुलकर्णी यांना अडचणीत आणण्याचा बराच प्रयत्न केला. परंतु कुलकर्णी यांनी प्रयत्न हाणून पाडला. रजिस्टर च्या माध्यमातून साक्षीदार अमोल भंडारेबाबत कोणताही उल्लेख नसल्याचा दावा तपकिरी यांनी केला होता. याचवेळी त्यांनी कॉन्स्टेबल मुल्ला याला सराफ कट्टा येथे रात्री नऊ ते सकाळी नऊ या कालावधीत कर्तव्य नेमण्यात आले होते.
त्यावेळी मुल्ला तेथे हजर होता असे तपकिरे म्हणाले. मात्र कुलकर्णी यांनी तपकिरे यांचे म्हणणे खोडून काढत आरोपी मुल्ला हा सराफ कट्टा पॉईंटवर हजर नव्हता असे स्पष्ट केले. गुन्ह्यातील महत्त्वाचे साक्षीदार श्रीकांत बुलबुले तसेच मारुती लोंढे यांनी त्यांना असलेली माहिती वरिष्ठांना सांगणे अपेक्षित असताना दोघांनीही ती माहिती वरिष्ठांना सांगितली नाही म्हणून त्यांच्यावर कारवाईची अपेक्षा होती.
परंतु दोघांचेही गुन्ह्याचा तपास करण्यासाठी मदत तसेच सहकार्य मिळावे म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांना साक्षीदार केले असे तपकिरे यांनी नमूद केले. परंतु त्यांची ही भूमिका कुलकर्णी यांनी फेटाळून लावली. अनिकेत कोथळे यांचा मृतदेह अंबोली येथे ज्या ठिकाणी मिळून आला ती जागा आणि घटनास्थळ दोन्ही वेगवेगळे आहेत असे तपकिरे म्हणाले मात्र कुलकर्णी यांनी दोन्ही जागा एकच असल्याचे ठणकावून सांगितले.
वरिष्ठांच्या सांगण्यावरून सदर खून प्रकरणातील सर्व आरोपींना वाचवण्याकरता नसरुद्दीन मुल्ला यांच्याविरोधात खोटी केस दाखल केली असून खोटी साक्ष देत असल्याचे आरोप तपकिरे यांनी केले मात्र कुलकर्णी यांनी हे देखील आरोप फेटाळून लावले. आज कुलकर्णी यांच्या उलट तपासणी दरम्यान विशेष सरकारी वकील एडवोकेट उज्वल निकम तसेच बडतर्फ आरोपी कॉन्स्टेबल मुल्ला याचे वकील गिरीश तपकिरे यांच्या दरम्यान तपास अधिकारी कुलकर्णी यांना प्रश्न विचारण्याच्या कारणांवरून कायदेशीर मुद्द्यांवर शाब्दिक खडा जंगी वारंवार उडत राहिली. तपास अधिकारी कुलकर्णी यांची आज उलट तपासणी संपली. जिल्हा सरकारी वकील एडवोकेट प्रमोद भोकरे यांनी विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांना सहकार्य केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.