अब्जाधीश मुलीचा जीव जडला अत्यंत गरीब मुलावर, प्रेमासाठी धुडकावली बापाची कोट्यवधीची संपत्ती
मुंबई, 9 ऑगस्ट : माणूस जेव्हा प्रेमात असतो तेव्हा तो जोडीदारासाठी काहीही करायला तयार होतो. प्रेमासाठी व्यक्ती घरच्यांविरोधात बंडही करायला मागे पुढे पाहत नाही. या गोष्टी फक्त बॉलिवूड चित्रपटातच होत नाहीत तर खऱ्या आयुष्यातही घडतात.
सचिन मीणा आणि पाकिस्तानी नागरिक सीमा हैदर यांच्या लव्ह स्टोरीनंतर आता मलेशियातल्या करोडपती महिलेची कहाणीही चर्चेत आली आहे.एंजलीन फ्रान्सिस खो नावाची महिला मलेशियातला मोठा उद्योजक खू के पेंग यांची मुलगी आहे. एंजलीनची आई पॉलीन चाय माजी मिस एशिया होती. के पेंग मलेशियन युनायटेड इंडस्ट्रीचे मालक होते. ब्रिटीश लाईफस्टाईल आणि डिझायनर ब्रांड लौरा एशलीमध्येही त्यांची गुंतवणूक होती.
एंजलीनच्या वडिलांची नेट वर्थ 300 मिलियन डॉलर म्हणजेच
2 हजार कोटी रुपये होती, पण एंजलीनच्या आयुष्यात अशा काही घटना घडल्या ज्यामुळे तिने वडिलांची कोट्यवधींची संपत्ती धुडकावली.एंजलीन 2001 साली ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घ्यायला गेली होती, तेव्हाच तिची भेट कॅरेबियनमध्ये जन्मलेल्या डेटा सायनटिस्ट जेदीदिआ फ्रान्सिससोबत झाली. फ्रान्सिसशी प्रेम जडल्यानंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला, पण या गोष्टीमुळे एंजलीनचे वडील नाराज झाले. मुलगा तुझ्यासाठी योग्य नसल्याचं सांगत वडिलांनी या लग्नाला नकार दिला. यानंतर एंजलीन नाराज झाली आणि वडिलांची संपूर्ण संपत्ती सोडून फ्रान्सिससोबत लग्न करायला गेली.
या दोघांचं लग्न 2008-09 साली झालं.यानंतर 2015 साली एंजलीनने Rosie On Fire नावाच्या लक्झरी कपड्यांचा ब्रॅण्ड सुरू केला. एंजलीनला तिच्या पतीनेही यामध्ये साथ दिली. यानंतर आईही एंजलीनला मदत करण्यासाठी पोहोचली. यानंतर एंजलीनच्या आई-वडिलांचा घटस्फोटाचा खटला सुरू झाला. चार वर्ष हा खटला चालला आणि 2017 साली 600 कोटी रुपये पत्नी पॉलीनला देण्यात यावेत, असे आदेश कोर्टाने खू के पेंग यांना दिले. आता ती तिचा व्यवसाय सांभाळत आहे. इन्स्टाग्रामवरही 2020 नंतर ती ऍक्टिव्ह नाही, पण तिची कहाणी कायमच चर्चेत येते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.