Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शिवसेने शिंदे समर्थकावर जीवघेणा हल्ला; वाहनाची तोडफोड

शिवसेने शिंदे समर्थकावर जीवघेणा हल्ला; वाहनाची तोडफोड 


मुंबई:  मुंबईमधून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना शिंदे समर्थक अल्ताफ पेवेकर यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांकडून हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात पेवेकर हे थोडक्यात बचावले आहेत. अल्ताफ पेवेकर हे सात बंगला मेट्रो स्टेशन जवळून जात असताना काही अज्ञात व्यक्तीनं त्यांच्या वाहनावर हल्ला केला. या घटनेनं खळबळ उडाली आहे. किरकोळ दुखापत घटनेबाबत अधिक माहिती अशी की अल्ताफ पेवेकर हे सात बंगला मेट्रो स्टेशनच्या जवळून जात होते. त्याचवेळी अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या वाहनावर हल्ला केला.

या हल्ल्यात वाहनाची काच फुटली आहे. तसेच पेवेकर यांना देखील थोडी दुखापत झाली आहे. हल्ल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाला. ही घटना सोमवारी रात्री 11:30 च्या दरम्यान घडली आहे.वाहनाची काच फोडली पेवेकर हे आपल्या गाडीतून वर्सोवाच्या दिशेनं घरी निघाले होते.

त्यांची गाडी सात बंगला मेट्रो स्टेशनच्या जवळ आली असता हा हल्ला झाला आहे. चेहऱ्याला रुमाल बांधून आलेल्या काही अज्ञात हल्लेखोरांनी बॅटने पेवेकर यांच्या वाहनाची काच फोडली. या घटनेत पेवेकर यांना किरकोळ दुखापत झाली आहे. दरम्यान ठाकरे समर्थकांनी हा हल्ला केल्याचा आरोप पेवेकर यांच्याकडून करण्यात आला आहे. या घटनेनंतर पेवेकर यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.