Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्यावर बलात्काराचा आरोप..

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्यावर बलात्काराचा आरोप..


मुंबई : हिंदी टीव्ही जगतातील एका प्रसिद्ध अभिनेत्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर त्याने अनैसर्गिक कृत्यही केले असा दावा आरोप करणाऱ्या तरुणीने केला आहे. आरोप करणारी तरुणी सुद्धा एक अभिनेत्री आहे.

प्राथमिक माहितीनुसार, दोघांमध्ये रिलेशन होते. त्यानंतर अभिनेत्याचा अभिनेत्रीचा विश्वासघात केला. मुंबईतील वनराई पोलिस ठाण्यात अभिनेत्रीने पुनीत सिंह राजपूत याच्या विरोधात तक्रार दिली आहे. त्यात तिने सांगितले की पुनीत आणि ती एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. परंतु, काही दिवसांत पुनीतने शब्द फिरवले.

लग्नाचे अमीष दाखवून तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. तिचा शारीरिक छळ केला तसेच अनैसर्गिक कृत्य देखील केले. यानंतर मात्र त्याने लग्न करण्यास नकार दिला. आपला छळ झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने पोलिसांत धाव घेतली.

तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून मुंबईच्या वनराई पोलिस स्टेशनमध्ये अभिनेत्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या विरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम 376 (2) (ड) आणि 377 अंतर्गत बलात्कार आणि अनैसर्गिक कृत्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत सविस्तर तपास केला जात आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.