काँग्रेस पक्षामुळे स्वातंत्र्य मिळाले..पृथ्वीराज पाटील
सांगली दि. १५: म. गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या त्यागाने देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. देश गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिलेला लढा अविस्मरणीय आहे. काँग्रेस पक्षाने स्वराज्य मिळवून दिले व त्याचे सुराज्यही केले. देशाची चौफेर प्रगती झाली. म. गांधी, पंडित नेहरु, मौलाना आझाद, सरदार पटेल, नेताजी सुभाषचंद्र बोस व असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी देश स्वतंत्र करण्यासाठी खूप खस्ता खाल्ल्या आहेत हे विसरून चालणार नाही.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खरगे, नेते सोनियाजी व राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाची देशात दमदार वाटचाल सुरू आहे. स्वातंत्र्य आणि राष्ट्रध्वज तिरंगा यांचा अवमान देशाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. सर्वधर्म समभाव हा समतेचा विचार रुजवण्याचे आव्हान मोठे आहे. स्वातंत्र्यासाठी बलिदान केलेल्या हुतात्म्यांना अभिवादन आणि कृतज्ञता व्यक्त करणे आपले आद्य कर्तव्य आहे. सर्व पुरोगामी व संविधानप्रेमींनी एकजुटीने देशासमोरील आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी पुढे यावे तरच स्वातंत्र्य व लोकशाही अबाधित राहील असे प्रतिपादन सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केले.
आज काँग्रेस पक्षाच्या वतीने काँग्रेस भवन समोर व स्टेशन चौकात म. गांधी पुतळ्यासमोर त्यांच्या हस्ते ध्वजारोहण व ध्वजवंदन झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी झेंडा गीत, वंदे मातरम व राष्ट्रगीताचे भक्तीपूर्वक गायन झाले. याप्रसंगी शैलजाभाभी पाटील,मालन मोहिते, अजित ढोले,अरुण पळसुले, प्रा. एन.डी.बिरनाळे, उदय पवार, लालसाब तांबोळी, पैगंबर शेख, प्रकाश जगताप, शैलेंद्र पिराळे, नामदेव कस्तूरे, श्री व सौ. भारती भगत, तुकाराम बगाडे, बाबगोंडा पाटील, श्रीधर बारटक्के, विश्वास यादव,नामदेव पठाडे, चेतन पाटील, सचिन चव्हाण,आबा जाधव, अशोक मालवणकर, रामचंद्र पवार, सुरेश गायकवाड, प्रथमेश शेटे, अक्षय पाटील, कांचन खंदारे, वसंतराव व मायाताई आरगे,प्रतिक्षा काळे,शमशाद व जन्नत नायकवडी, नामदेव पठाडे, फरहान भालदार, अमोल जाधव, याकुब मणेर, भिमराव चौगुले, अमित पारेकर, मोहसीन मुजावर, राजेंद्र कांबळे, रामलिंग परदेशी, गणेश वाघमारे, मंदार सुर्यवंशी, सीमा कुलकर्णी, शिवाजी सावंत, विठ्ठलराव काळे, भाऊसाहेब पवार, युनुस जमादार व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.