अजित पवार माझा पुतण्या, राष्ट्रवादीत फूट नाही म्हणत शरद पवार यांनी 'ती' शक्यता फेटाळली
मुंबई: 13 ऑगस्ट 2023 : केंद्रीय निवडणूक आयोगाने आम्हाला काही प्रश्न विचारले. त्याला आम्ही उत्तर देताना राष्ट्रवादीमध्ये फूट नाही असे सांगितले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी काही राजकीय धोरणे आहेत त्यामध्ये भाजपसोबत जाणार नाही असे स्पष्ट आहे.
त्यामुळे आम्ही कोणीही भाजपसोबत नाही. मात्र, आमच्यातील काही सहकारी आहेत त्यांनी वेगळी भूमिका घेतली. त्यांच्यात काही परिवर्तन होईल का? असे प्रश्न काही हितचिंतक करतात. पण, राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मी स्वच्छ भूमिका सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपसोबत जाणार नाही, असे राष्ट्रवादीचे नेते
शरद पवार यांनी स्पष्ट केले. सांगोला येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. मुंबईमध्ये INDIA ची बैठक आहे. त्यापूर्वी सकाळी दहा वाजता मुंबईच्या हॉटेलमध्ये सगळ्या नेत्यांची बैठक आहे. या बैठकीमध्ये वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे तीस ते चाळीस नेते इंडियामध्ये एकत्र काम केले पाहिजे या मताने जमणार आहेत. ही बैठक मी, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले या सगळ्यांनी आयोजित केली आहे. त्या बैठकीच्या आमंत्रण आमच्या तिघांकडून देण्यात आले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.