Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

माणूसकीला काळिमा! पतीच्या उपचारासाठी उधार घेतलेले पैसे; व्याज न दिल्याने महिलेवर बलात्कार

राजस्थानच्या नागौरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. पॅरालिसिसने ​​त्रस्त असलेल्या पतीच्या उपचारासाठी एका महिलेने एका व्यक्तीकडून पैसे घेतले होते. पैसे देणाऱ्या व्यक्तीने महिलेवर बलात्कार करून व्हिडीओ व्हायरल केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

महिलेने पतीच्या उपचारासाठी पैसे उभे करण्याचा प्रयत्न केला, मात्र पैशाची कुठेही व्यवस्था होऊ शकली नाही. यानंतर तिने नागौर येथील दिल्ली दरवाजाजवळ राहणाऱ्या मेहरदीनशी संपर्क साधला. मेहरदीन व्याजावर पैसे देतो, असे महिलेला सांगण्यात आले.

महिला मेहरदीनकडे गेली आणि दहा हजार रुपये कर्ज घेऊन आली. त्या महिलेने मेहरदीनला पाच हजार रुपये दिले. ती दरमहा 500 रुपये देत राहिली. एके दिवशी महिलेचा नवरा बाहेर गेला होता. दरम्यान, मेहरदीनने महिलेच्या घरात घुसून तिच्यावर बलात्कार केला. अश्लील व्हिडिओ बनवले.

मेहरदीनने महिलेवर हॉटेलमध्ये बलात्कार केल्याचा आरोप आहे आणि तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पीडितेने तलावात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. स्थानिक लोकांनी ते पाहिल्यानंतर त्यांनी तातडीने तिला वाचवलं. या संपूर्ण प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

नागौर कोतवालीचे सीआयए रमेंद्र सिंह हाडा यांनी सांगितलं की, एका महिलेने एका व्यक्तीकडून काही पैसे उसने घेतल्याचे सांगितले. तिने पैसे परत केले. व्याजासाठी तो सतत तिला त्रास देत राहिला आणि तिच्यावर बलात्कार केला. तिचा व्हिडीओ व्हायरल केला. या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.