जुन्या पेन्शनचा निर्णय तात्काळ न झाल्यास पुन्हा बेमुदत संपाचा इशारा ; पुणे विभागीय सचिव पी एन काळे
जुन्या पेन्शनचा निर्णय तात्काळ न झाल्यास पुन्हा बेमुदत संपाचा इशारा.... पुणे विभागीय सचिव पी एन काळे......
एक नोव्हेंबर 2005 नंतर शासनात रुजू झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी 14 मार्च ते 20 मार्च 2023 या सात दिवसात प्रचंड राज्यात प्रचंड मोठा बेमुदत संप करण्यात आला होता .या अनुषंगाने शासनाने समिती गठीत केली आणि तीन महिन्यानंतर लेखी निर्णयाचे आश्वासन दिले .तीन महिने उलटून गेल्यानंतर समितीला पुन्हा दोन महिन्याची मुदतवाढ दिली.
14 ऑगस्टला ती मुदतवाढ संपुष्टात येत आहे. यानंतर तात्काळ निर्णय सरकारने घ्यावा व जुन्या पेन्शन धारकांची पेन्शन सुरू करावी ही आग्रही मागणी या मोर्चाच्या निमित्ताने करण्यात आली भविष्यात कंत्राटी पदे भरण्याच्या सरकारच्या या धोरणाला या मोर्चाच्या माध्यमातून विरोध करण्यात आला.सरकारने ताबडतोब या सर्व बाबींवर निर्णय दिला नाही तर पुन्हा एकदा राज्य सरकारी निमसरकारी जिल्हा परिषद शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पुन्हा एकदा बेमुदत संपावर जातील असा इशारा राज्य सरकारी निमसरकारी जिल्हा परिषद शिक्षक शिक्षकेतर समन्वय समितीचे निमंत्रक श्री पी. एन. काळे यांनी दिला. यावेळी ज्येष्ठ नेते डी जी मुलाणी, गणेश धुमाळ, संजय व्हणमने, रवी अर्जुने ,सतीश यादव, एस एच सूर्यवंशी, सुमन ताई पुजारी , तसेच श्रमिक संघटनेचे नेते गोपाल पाटील व सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.