Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कडेगाव उपनगराध्यक्षपदी नाजनीन पटेल बिनविरोध


कडेगाव नगरपंचायतीच्या  उपनगराध्यक्षपदी भाजपच्या नाजनिन मुक्तार पटेल यांची बिनविरोध निवड झाली. पीठासीन अधिकारी म्हणून प्रांताधिकारी विजय देशमुख यांनी काम पाहिले.
तर सहायक म्हणून नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. पवन म्हेत्रे यांनी काम पाहिले. उपनगराध्यक्षपदी पटेल यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक बिनविरोध झाली. निवडीनंतर त्यांचा कडेगाव नगरपंचायतीच्या प्रांगणामध्ये सत्कार करण्यात आला. तर भाजप कार्यकर्त्यांनी, गुलालाची उधळण व फटक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला

कडेगाव नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख व सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भाजपने 17 पैकी 11 जागा जिंकत एकहाती सत्ता काबीज केली. तर काँग्रेसला केवळ पाच जागांवर समाधान मानावे लागले होते. तर राष्ट्रवादीने एका जागेवर विजय संपादन केला होता. त्यानंतर भाजपचे धनंजय देशमुख यांची नगराध्यक्ष पदी तर उपनगराध्यक्ष पदी विजय गायकवाड यांची निवड झाली होती. पक्षादेशानुसर विजय गायकवाड यांनी आपला कालावधी संपल्यानंतर राजीनामा दिला होता. यानंतर उपनगराध्यक्षपदी नाजनीन मूकतार पटेल यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी कडेगावचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख, माजी उपनगराध्यक्ष विजय गायकवाड, बांधकाम सभापती अमोल डांगे, आरोग्य सभापती निलेश लंगडे, ज्येष्ठ नेते चंद्रसेन देशमुख, श्रीमंत शिंदे, सुनील गाढवे, नगरसेविका विद्या खाडे, शुभदा देशमुख, मनीषा राजपूत, नजमाबी पठाण, दीपा चव्हाण, रंजना लोखंडे, हनीफ आतार, हाजी शौकत पटेल, प्रकाश शिंदे, संदिप गायकवाड, राकेश जरग,जगदिश लोखंडे, समीर ईनामदार, रियाज ईनामदार, राजेंद्र दीक्षित, मानव परदेशी, शकील पटेल, मारुती माळी, आशरफ तांबोळी आदीसह भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.

कडेगाव शहराचा माजी आमदार पृथ्वीराज देशमुख व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख आणि नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार. सर्वांना बरोबर घेवून कोणताही भेदभाव न करता पारदर्शक कारभार केला जाईल.

– नाजनीन पटेल, नूतन उपनगराध्यक्ष, कडेगाव नगरपंचायत

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.