Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत वाईन शॉपचा परवाना देतो म्हणून एकाची ८७ लाखांची फसवणूक

सांगलीत वाईन शॉपचा परवाना देतो म्हणून एकाची ८७ लाखांची फसवणूक


सांगली दिं.१३: वाईन शॉपचा परवाना देण्याच्या बहाण्याने शहरातील एकाची ८७ लाखांची फसवणूक करण्यात आली. ही घटना फेब्रुवारी २०२३ ते एप्रिल २०२३ या कालावधीत घडली.  

याबाबत ए.बी. पवार ( रा. सांगली ) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी बसाप्पा शिवप्पा माळी (रा. सांगली ) याच्याविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती अशी, फिर्यादी पवार यांना वाईन शॉपचा परवाना हवा होता. ही माहिती संशयीत बसाप्पा माळी यास समजली. त्याने पवार यांच्याशी संपर्क साधून माझ्या वरिष्ठांच्या ओळखी असून वाईन शॉपचा परवाना काढून देण्याचे आश्वासन दिले. संशयीत माळी याच्या सांगण्यावर विश्वास ठेवून पवार यांनी त्यास परवाना काढून देण्यात सांगितले.

यानंतर संशयीताने, परवाना काढण्याकरिता पैसे लागणार असल्याचे सांगून फिर्यादी पवार यांच्याकडून वेळोवेळी रोख १८ लाख रुपये  तसेच सोन्याचे दागिने असे ८७ लाख २५ हजार ५०० रुपये घेतले. विश्वास संपादन करण्यासाठी संशयीत माळी याने त्यांना बनावट शासकीय चलनाच्या पावत्या दिल्या. दिलेल्या मुदतीत परवाना न मिळाल्याने फिर्यादी पवार यांनी संशयीत माळी याच्याशी संपर्क साधला असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी पवार यांनी पोलीस ठाण्याशी संपर्क साधून फिर्याद दाखल केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.