Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नालसाब मुल्ला खून प्रकरणातील १३ संशयितांवर मोकाअंतर्गत कारवाई!

नालसाब मुल्ला खून प्रकरणातील १३ संशयितांवर मोकाअंतर्गत कारवाई!

सांगली :  राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आणि रेकॉर्डवरील गुन्हेगार नालसाब मुल्ला याच्या खून प्रकरणातील १३ जणांवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सांगली पोलिसांनी याबाबत पाठवलेल्या प्रस्तावाला कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी मान्यता दिली आहे. खुनातील संशयित टोळीवर मोका अंतर्गत कारवाई झाल्याने गुन्हेगारी टोळ्यांचे कंबरडेच मोडले आहे. 

स्वप्नील संतोष मलमे (वय २०, रा. खरशिंग), सनी सुनील कुरणे (वय २३, रा. शाहुनगर, जयसिंगपूर), विशाल सुरेश कोळपे (वय २०, रा. लिंबेवाडी, रांजणी), सचिन विजय डोंगरे (रा. सांगली, सध्या कळंबा कारागृह), प्रशांत ऊर्फ बबलू संभाजी चव्हाण (वय २३, रा. खरशिंग), रोहित अंकुश मंडले (वय २२, रा. खरशिंग), ऋतीक बुद्ध माने (वय २२, रा. कोकळे), विक्रम तमान्ना घागरे (वय २२, रा. ढालगाव), प्रवीण अशोक बाबर (रा. आलेगाव, ता. सांगोला), अक्षय बाळासाहेब शेंडगे (रा. कलानगर, सांगली), अवधूत सुनील पानबुडे (रा. नळभाग, सांगली), रोहित बाबासाहेब धेंडे (रा. एरंडोली), अल्पक राजकुमार कांबळे (रा. एरंडोली) अशी कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत. 


सांगलीतील गुलाब कॉलनी येथे दि. १७ जून रोजी रात्री सव्वानऊच्या सुमारास नालसाब मुल्ला त्याच्या घरासमोर थांबला होता. त्यावेळी संशयितांनी त्याच्यावर देशी बनावटीच्या पिस्तूल, तसेच धारदार शस्त्रांनी वार करून त्याचा खून केला होता. यातील दोन संशयित अद्याप पसार आहेत. दरम्यान ही टोळी २०१५ पासून वर्चस्व टिकवण्यासाठी खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, बेकायदा पिस्तूल वापरणे तसेच त्यांची विक्री करणे, गुन्ह्याचा कट रचणे, घातक शस्त्रे बाळगून खंडणी उकळणे असे गंभीर गुन्हे करत आहे. त्यामुळे त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमानुसार मोकाची कारवाई करण्याचा प्रस्ताव विश्रामबागचे पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्याकडे पाठवला होता. त्यांनी तो मंजुरीसाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला होता. त्या प्रस्तावाला श्री. फुलारी यांनी मंजुरी दिली आहे. याचा पुढील तपास सांगली शहरचे उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव करत आहेत. एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे, विश्रामबागचे निरीक्षक संजय मोरे, सिद्धाप्पा रूपनर, दीपक गट्टे, बसवराज शिरगुप्पी, विक्रम चव्हाण आदींनी या कारवाईत भाग घेतला.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.