विनायक शेटे यांचा केमिस्ट असोशिएशनच्या प्रगतीस हातभार लागेल संस्थापक अध्यक्ष श्री. रावसाहेब पाटील यांनी व्यक्त केली भावना
सांगली :- श्री. विनायक शेटे यांची महाराष्ट्र राज्य केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोशिएशन ( वेस्ट झोन) च्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन तसेच जिल्हा केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोशिएशनचे संस्थापक अध्यक्ष श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मा. रावसाहेब पाटील यांनी नवनियुक्त मंडळास शुभेच्छा देताना आपण असोशिएशनच्या उत्कर्षासाठी व असोशिएशचे प्रश्न शासन दरबारी मांडून त्यास न्याय देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी भावना व्यक्त केली. असोशिएशनला सामाजिक कार्याची देखिल उज्ज्वल परंपरा आहे. ती तशीच पुढे घेऊन जावी. त्यासाठी श्री. विनायक शेटे निश्चित कार्य करतील. कारण त्यांचा कामातील उत्साह मोठा आहे. हातात घेतलेले काम पुर्णत्वास घेऊन जाणे हा या त्यांच्या स्वभावासी मी परिचीत असून ते नेहमी सकारात्मक विचाराने ते प्रेरीत असल्याचे श्री. रावसाहेब पाटील म्हणाले.
यावेळी सत्कारास उत्तर देताना नवनियुक्त उपाध्यक्ष श्री. विनायक शेटे म्हणाले कि एमएससीडीए चे अध्यक्ष मा. जगन्नाथरावजी शिंदे ( आप्पा ) यांचे तसेच जिल्हा केमिस्ट असोशिएशनचे नेते मा. विजय पाटील यांनी माझ्या निवडीसाठी सहकार्य केल्याचे सांगुन त्यांच्या सहकार्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले. यावेळी केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोशिएशनचे पदाधिकारी श्री. राजाराम पाटील श्री. अनिल गुजराथी. श्री. अजित सकळे, श्री. विकास चौगुले यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.