Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तथाकथित राष्ट्रसंताला पंढरपुरातून अटक; महिलेवर अत्याचाराचा होता गुन्हा

तथाकथित राष्ट्रसंताला पंढरपुरातून अटक; महिलेवर अत्याचाराचा होता गुन्हा 


धाराशिव : दर्शनासाठी आलेल्या महिलेस खोलीमध्ये बोलावून घेत विनयभंग करुन मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी स्वयंघोषीत राष्ट्रसंत एकनाथ महाराज लोमटे याला पंढरपुरातून अटक केली आहे
न्यायालयाच्या आदेशानुसार  पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले आहे. 

परळी येथील ३५ वर्षीय महिला २८ जुलै २०२२ रोजी मठातील दर्शन मंडपामध्ये बसली होती. या दरम्यान महाराजांनी महिलेस प्रवचन हॉलशेजारील खोलीमध्ये बोलावून घेत महिलेचा विनयभंग केल्याची तक्रार पीडित महिलेने पोलिसात दिली  होती. या प्रकरणात अटकही झाली होती. मात्र त्याची जामीनावर सुटका झाली होती. त्यानंतर पीडित भाविक महिलेने न्यायालयात धाव घेतली व न्यायालयाच्या आदेशाने तथाकथित राष्ट्रसंत एकनाथ महाराजाला पोलिसांनी पुन्हा एकदा एकदा पंढरपूर येथून अटक केली आहे.

महाराजाचा मोठा भक्त परिवार

या महाराजाचा भक्त परिवार बराच मोठा असून राज्यातील प्रमुख राजकीय मंडळीसोबत त्याची उठबस आहे. दरम्यान पोलिसांनी कळंब येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर केले असता पोलिसांनी त्यांना १८ ऑगस्टपर्यंत दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.