Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुरूषांनी आपल्या शरीरातील बदलांकडे करू नये दुर्लक्ष, कॅन्सरचे असू शकेल लक्षण

पुरूषांनी आपल्या शरीरातील बदलांकडे करू नये दुर्लक्ष,  कॅन्सरचे असू शकेल लक्षण 


कर्करोग आणि इतर गंभीर आजारांचा धोका स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त असतो, असे विविध अभ्यासातून दिसून आले आहे. महिलांपेक्षा पुरुषांना सर्व प्रकारच्या कॅन्सरचा धोका अधिक असल्याचे अनेक अभ्यासातून समोर आले आहे. इतकंच नाही तर कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण महिलांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त आहे. त्यामुळेच पुरुषांनी आपल्या शरीरात होणाऱ्या बदलांकडे बारकाईने लक्ष ठेवले पाहिजे. आज आम्ही तुम्हाला अशा काही त्रासांबद्दल सांगणार होत ज्याकडे पुरुषांनी अजिबात दुर्लक्ष करू नये. msn.com याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.गिळताना त्रास होणे : तुम्हाला अन्न-पाणी गिळताना त्रास होत असे आणि हा त्रास सारखा होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये.

डॉक्टरांकडे जाऊन हे गळ्यातील गाठ किंवा कर्करोगाचे लक्षण तर नाही ना, हे तपासून घ्यावे.त्वचेत बदल : त्वचेवरील डाग, तीळ किंवा त्वचेवरील काही खुणांच्या आकारात आणि रंगात बदल होत असल्यास त्वरित तज्ज्ञांची मदत घ्यावी. कारण हे त्वचेच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते आणि हा कर्करोग खूप वेगाने पसरू शकतो.छातीत जळजळ : छातीत जळजळ होण्याचा त्रास पुरुषांना सामान्यपणे होत असतो. तो आहारातील बदलामुळे होऊ शकतो. मात्र सतत छातीत जळजळ देखील कर्करोगाचे लक्षण असू शकते, असे म्हणतात.

छातीतील तीव्र जळजळ अन्ननलिकेचे नुकसान करू शकते, ज्यामुळे भविष्यात घशाचा कर्करोग होण्याची शक्यता वाढते.खोकल्यातून रक्त येणे : टॉयलेटमध्ये रक्त तपासण्यासोबतच ते तुमच्या टूथब्रशवरही शोधा. असामान्य ठिकाणी नियमितपणे रक्त दिसू लागल्यास हे बहुतेकदा शरीरात काहीतरी गडबड झाल्याचे लक्षण असते. त्यासाठी वैद्यकीय मदत आवश्यक आहे.वजन कमी होणे : अचानक वजन कमी होत असल्यास त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. हे थायरॉईड समस्या, पोट किंवा फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते.

काहीही न करता तुमचे वजन वेगाने कमी होत असेल तर लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क साधा.सतत खोकला : तुम्हाला अनेक आठवडे खोकला राहात असेल आणि तो हळूहळू वाढत चालला असेल. तर तुम्ही तज्ज्ञाची मदत घेणे आवश्यक आहे. हे लक्षण फुफ्फुसाच्या कर्करोगापासून ब्राँकायटिसपर्यंतच्या आजारांचे असू शकते.थकवा : तणाव, आहार, जीवनशैलीचे घटक आणि नैराश्य या सर्वांमुळे आपल्याला थकवा जाणवू शकतो. मात्र अनेक आठवडे तीव्र थकवा राहाणे हे कर्करोगाचे लक्षण असू शकतो.ताप : ताप येणे म्हणजे तुमचे शरीर एखाद्या प्रकारच्या संसर्गाशी लढत आहे. मात्र काहीवेळा हे रक्त कर्करोगाचे लक्षण देखील असू शकते. ताप दीर्घकाळापर्यंत राहत असेल तर डॉक्टरांकडे जावे. तज्ज्ञ रक्त तपासणी करून सांगतील हा ताप गंभीर समस्या आहे की नाही.पोटदुखी : पोटदुखी किंवा पेटके हे पोटाच्या कर्करोगाचे किंवा स्वादुपिंडाच्या समस्यांचे लक्षण असू शकते. तीक्ष्ण आणि दीर्घकालीन वेदना या दोन्हीकडे तितकेच लक्ष दिले पाहिजे. नेहमीप्रमाणे विनाकारण टिकून राहिलेल्या कोणत्याही समस्यांचे अधिक परीक्षण केले पाहिजे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.