राहूल गांधी बाईकने लडाखच्या पॅंगॉन्ग तलावार पोहचले, केन्द्रीय मंत्री किरेण रिजूज यांनी त्याना धन्यवाद म्हटले?
कॉग्रेस नेते राहुल गांधी लडाख दौऱ्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आहेत. राहुल गांधी यांनी लडाखच्या बाईकवरुन केलेल्या राईडचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. या फोटोवरुन केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी शनिवारी ट्विट करुन राहुल गांधी यांचे 'धन्यवाद' मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हिमालयीन प्रदेशात बांधलेल्या उत्कृष्ट रस्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मोहीम सुरू केली. त्याबद्दल त्यांचे कौतुक केले, असं ट्विट रिजिजू यांनी केलं आहे.
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी मागील यूपीए सरकारच्या कार्यकाळात सीमावर्ती भागातील पायाभूत सुविधांच्या दुरवस्थेकडे लक्ष न दिल्याबद्दल राहुल गांधींचे लडाखमध्ये बाईक राइड केल्याबद्दल आभार मानले होते. रिजिजू यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ देखील पोस्ट केला आणि दावा केला की, हा २०१२ चा व्हिडीओ आहे. व्हिडिओमध्ये लडाखमधील पॅंगॉन्ग त्सोकडे जाणाऱ्या रस्त्यावर दगड पडताना दिसत आहेत आणि अनेक वाहने ते टाळण्याचा प्रयत्न करत आहेत.
यासोबतच मंत्री रिजिजू यांनी राहुल गांधींचा एक फोटो देखील पोस्ट केला आहे, यामध्ये काँग्रेस राहुल गांधी बाईकवरुन राईड करत आहेत, यात मागे पॅंगॉन्ग त्सोकडे जाणारा रस्ता दिसत आहे. हा रस्ता अतिशय सुंदर आणि चकाचक दिसत आहे. रिजिजू यांनी ट्विटर वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'नरेंद्र मोदी सरकारने बनवलेल्या लडाखच्या उत्कृष्ट रस्त्यांचा प्रचार केल्याबद्दल राहुल गांधी तुमचे आभार.'मंत्री रिजिजू म्हणाले की, यापूर्वी देखील राहुल गांधींनी काश्मीर खोऱ्यात पर्यटन कसे वाढत आहे हे दाखवले होते आणि सर्वांना आठवण करून दिली की, आता श्रीनगरच्या लाल चौकात शांततेने राष्ट्रध्वज फडकावता येईल. तसेच संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्विटवर लिहिले की, 'लेह आणि लडाखमधील कलम 370 हटवल्यानंतर झालेल्या घडामोडी पाहण्यासाठी आणि प्रचार करण्यासाठी राहुल गांधी स्वतः खोऱ्यात गेले आहेत. त्यांच्या रोड ट्रिपची झलक पाहून आम्ही उत्साहित आणि आनंदी आहोत.राहुल गांधी शनिवारी लडाखच्या रस्त्यावर स्पोर्ट्स बाईक चालवताना दिसले. या रोमांचक प्रवासाचे फोटोही त्यांनी इंस्टाग्राम पेजवर शेअर केले आहेत. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, पॅंगॉन्ग तलावाकडे जात आहे. राहुल गांधी दोन दिवसांच्या दौऱ्यावर गुरुवारी लेहला पोहोचले आणि नंतर पॅंगॉन्ग तलाव, नुब्रा व्हॅली आणि कारगिल जिल्हा कव्हर करण्यासाठी या प्रदेशातील आपला मुक्काम आणखी चार दिवस वाढवण्याचा निर्णय घेतला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.