ब्रिटनच्या प्रदूषण नियंत्रण प्रकल्पात सागंलीचा सुपुत्र चिरागचे योगदान, पंतप्रधान सुनक यांच्या कडून कौतूक
सागंली : सांगलीचे पुत्र चिराग चंद्रकांत देशमुख यांनी ब्रिटन येथील प्रदूषण नियंत्रण प्रकल्पामध्ये मोठे योगदान दिले. त्याबाबत ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी त्यांचे कौतुक केले. प्रदूषण नियंत्रणाची जबाबदारी ज्या आईल गॅस कंपनीला दिली त्या कंपनीच्या प्रकल्पाची धुरा चिराग सांभाळत आहेत.
देशमुख हे सध्या स्कॉटलँड येथील
एका ऑईल गॅस प्रकल्पाचे मुख्याधिकारी म्हणून काम पहात आहेत. जुलै २०२१ मध्ये पर्यावरणातील समतोल साधण्याच्या उद्देशाने जागतिक प्रदूषण नियंत्रणाच्या उपयायोजनेबाबत ब्रिटन येथे 'युनायटेड नेशन क्लायमेट चेंज' या विषयावर २६ वे आंतरराष्ट्रीय चर्चासत्र पार पडले.या परिषदेनंतर ब्रिटन सरकारने प्रदूषण नियंत्रणाची जबाबदारी अबर्डिन येथील आईल गॅस कंपनीस दिली. या प्रकल्पाचे मुख्याधिकारी म्हणून चिराग देशमुख यांनी काम पाहिले. प्रकल्पाच्या पाहणीदरम्यान पंतप्रधान सुनक यांनी चिरागच्या कामाचे कौतुक केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.