उदय सामंत घेणार पवारांची भेट!
मुंबई, 29 ऑगस्ट : मोठी बातमी समोर येत आहे. राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. मंत्री उदय सामंत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची आज भेट घेणार आहेत. या भेटीमध्ये अखील भारतीय नाट्य परिषदेसोबतच विविध विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे.
दरम्यान सध्या राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात असून, या भेटीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.दोन दिवसांपूर्वी बीडमध्ये अजित पवार यांची सभा पार पडली. या सभेमधून भुजबळांनी शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. भुजबळ यांच्या टीकेनंतर राष्ट्रवादीचा शरद पवार गट चांगलाच आक्रमक झाला आहे.
शरद पवार गटातील नेत्यांची अजित पवार गटावर जोरदार टीका सुरू आहे. तर अजित पवार गटाच्या नेत्यांकडून देखील या टीकेला तोडीस तोड उत्तर दिलं जातं आहे. आरोप-प्रत्यारोपावरून राजकारण तापलं असतानाच आता मोठी बातमी समोर आली आहे. उदय सामंत हे शरद पवार यांची भेट घेणार आहेत.या भेटीमध्ये अखील भारतीय नाट्य परिषदेसोबतच विविध विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे. या भेटीची राज्यात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.