Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

संभाजी भिडे यांच्या अडचणीत वाढ! भिडेंच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल

संभाजी भिडे यांच्या अडचणीत वाढ! भिडेंच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल


मुंबई: शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संस्थेचे संस्थापक आणि प्रमुख मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. महात्मा गांधीजींचे खरे वडील एक मुस्लिम जमीनदार असल्याचं भिडे यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. याच पार्श्वभूमीवर कुमार महर्षी यांनी संभाजी भिडे यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.

मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठांसमोर आज या याचिकेवर सुनावणी होणार असल्याचं बोललं जात आहे. संभाजी भिडे जातीय आणि सामाजिक एकोपा नष्ट करत आहे. महात्मा फुले, महात्मा गांधी, साईबाबा इत्यादींबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून संभाजी भिडे त्यांची बदनामी करत आहे. अनेकदा जाणीवपूर्वक अशी वादग्रस्त वक्तव्य केली जातात. या वक्तव्यामुळे देशातील सामाजिक आणि धार्मिक एकोपा नष्ट होताना दिसत आहे. त्याचबरोबर अशा विधानांमुळे लोकांमध्ये जातीय तेढ निर्माण होत आहे. त्यामुळे न्यायालयाने अशी वक्तव्य करण्यापासून त्यांना मनाई करावी, असं या याचिकेमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. “करमचंद गांधी हे महात्मा गांधीजींचे खरे वडील नाही. त्या काळात करमचंद गांधी एका मुस्लिम जमीनदाराकडे कामासाठी होते. एक दिवस करमचंद गांधी त्या मुस्लिम जमीनदाराची मोठी रक्कम घेऊन पळून गेले. त्यानंतर त्या मुस्लिम जमीनदाराने त्यांच्या पत्नीला म्हणजेच महात्मा गांधीजींच्या आईला पळवून घरी आणले. त्यानंतर त्या जमीनदाराने त्यांच्यासोबत पत्नीसारखा व्यवहार केला. म्हणून महात्मा गांधीजींचे खरे वडील करमचंद गांधी नसून ते मुस्लिम जमीनदार आहे”, असं संभाजी भिडे यांनी म्हटलं होतं.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.