Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महिला शिक्षण अधिकारायाला अटक; नोकरीचे अमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक

महिला शिक्षण अधिकारायाला अटक; नोकरीचे अमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक 


शिक्षण विभागात नोकरी लावण्याच्या अमिषाने 44 जणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी राज्य परिक्षा परिषदेच्या आयुक्त शैलेजा रामचंद्र दराडे यांना अटक केली आहे.

या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सहा महिन्यांनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.गेल्या काही महिन्यापासून दराडे यांच्याकडे याबाबत चौकशी सुरू होती. सोमवारी त्यांना चौकशीसाठी हडपसर पोलिसांनी बोलावले होते, त्यानंतर त्यांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.दरम्यान यापूर्वी त्यांचा भाऊ दादासाहेब रामचंद्र दराडे याला अटक करण्यात आली आहे. दोघांवर हडपसर पोलीस ठाण्यात संगनमत करून फसवणूक आणि अपहार केल्याचा गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी पोपट सुखदेव सुर्यवंशी यांनी फिर्याद दिली आहे.फिर्यादी असलेल्या पोपट सुखदेव सूर्यवंशी हे शिक्षक आहे.

आपल्या नात्यातल्या महिलेला शिक्षकाची नोकरी पाहिजे म्हणून सूर्यवंशी यांनी जून 2019 मध्ये दादासाहेब दराडे यांची भेट घेतली. यावेळी दादासाहेब दराडे यांनी आपली बहिण शिक्षण विभागात अधिकारी असल्याचं सांगितलं. तुमच्या नात्यातल्या 2 महिलांना शिक्षक म्हणून नोकरी लावतो, असं आमिष दाखवत दादासाहेब दराडे यांनी 27 लाख रुपये घेतले, पण अनेक महिने उलटल्यानंतरही नातेवाईकांना नोकरी लागत नसल्यामुळे सूर्यवंशी यांनी याबाबत दराडेंकडे विचारणा केली. तसंच पैसे परत मिळवण्याची मागणी केली, पण दराडेंनी पैसे परत दिले नाहीत. पैसे परत मिळत नसल्यामुळे सूर्यवंशी यांनी हडपसर पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. यानंतर हडपसर पोलिसांनी दादासाहेब दराडे यांना आधीच अटक केली, त्यानंतर आता दादासाहेब दराडेंची बहिण आणि शिक्षण अधिकारी शैलेजा रामचंद्र दराडे यांना अटक केली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.