मी मुस्लिमांकडे मते मागणार नाही, आसामचे मुख्यमंत्री हिमंत शर्मा यांची दर्पोक्ती
सध्या तरी मला मुस्लिम मतांची गरज नाही, असे म्हणत आसाममधील भाजपा सरकारचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांनी त्यांच्या 'मियां मुस्लिम' विचारधारेचा पुनरुच्चार केला आहे. गेल्या वेळी मी त्यांच्या वस्त्यांत प्रचार केला नव्हता, आताही भाजप त्यांच्या भागात प्रचार करून मतं मागणार नाही, अशी दर्पोक्ती शर्मा यांनी केली.
एकगठ्ठा मतांच्या राजकारणामुळेच सर्व प्रश्न निर्माण होतात. मी मुस्लिम वस्त्यांमध्ये जातो, त्यांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहातो, त्यांना भेटतो. पण विकास आणि राजकारणाची मी सांगड घालत नाही. काँग्रेसने त्यांच्याशी जोडलेले संबंध हे केवळ मतांसाठी आहेत हे मुस्लिमांना कळायला हवं, असे शर्मा यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.