केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार, सामान्य लोकांसाठी नेहमीच विविध प्रकारच्या योजना राबवत असते. काहीजण या योजनांपासून वंचित राहतात, तर काहीजण या योजनांचा पूर्ण लाभ घेतात
मध्य प्रदेशातील खरगोनमध्ये राहणारे एक संयुक्त कुटुंब, अशाच लाभार्थ्यांपैकी आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण या कुटुंबाला विविध सरकारी यौजनांमधून दरमहा 62 हजार रुपये मिळतात.
मिळालेल्या माहितीनुसार, या संयुक्त कुटुंबात 90 हून अधिक सदस्य आहेत. या कुटुंबातील 17 महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळतोय. यातील 12 महिलांना लाडली बहना योजनेचा, तर पाच महिलांना प्रधानमंत्री आवास योजना आणि किसान सन्मान निधीचा लाभ मिळत आहे. एवढं मोठं कुटुंब असल्याने या कुटुंब प्रमुखाच्या नावावरुनच गावाचं नाव आहे. या गावाचे नाव वासल्या फलिया(तांडा) आहे.
या कुटुंबाची एवढी मोठी संख्या असतानाही एकत्र राहिल्याबद्दल खरगोनचे डीएम शिवराज सिंह वर्मा यांनी स्वत: त्यांचे कौतुक केले आहे. खरगोन जिल्ह्याच्या मुख्यालयापासून 45 किमी अंतरावर हे गाव आहे. साधारण आदिवासी गावात 8-10 कुटुंबे राहतात, पण वासल्या फलियात एकच कुटुंब राहते. दिवंगत वासल्या पटेल यांच्या या कुटुंबात 5 मुले आणि 6 भाऊ आहेत.
या कुटुंबात एकूण 44 पुरुष आणि 46 महिला, असे एकूण 90 लोक आहेत. कुटुंबातील काही लोकांसाठी स्वतंत्र स्वयंपाकघर आहे, परंतु संपूर्ण कुटुंब अजूनही एकत्र राहतात. आदिवासी समाजातील नागरिकांमध्ये ही जुनी परंपरा आहे की, लग्नानंतर ते त्यांच्या पत्नी आणि मुलांसह वेगळ्या घरात राहू लागतात, परंतु त्यांचे स्वयंपाकघर आणि शेती एकत्रित असते. काहीवेळा त्यांचे स्वयंपाकघर वेगळे होतात, परंतु त्यांच्यात असलेली एकता कमी होत नाही.
या कुटुंबातील महिलांना लाडली बहना आणि इतर दोन योजनांतर्गत दरमहा 62 हजार रुपये देण्यात येत असल्याचे जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितले. ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होते. या योजनेतून मिळालेली रक्कम मुलांच्या शिक्षण आणि आरोग्यावर खर्च करण्यात येत असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.