Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जगातील सर्वात श्रीमंत बिल गेट्स यांचा सर्वात महागडा घटस्फोट; 60000 कोटी दिली रक्कम

जगातील सर्वात श्रीमंत बिल गेट्स यांचा सर्वात महागडा घटस्फोट; 60000 कोटी दिली रक्कम 


वॉशिंग्टन : पती-पत्नीमधील काही कौटुंबिक वाद असो किंवा इतर काही वाद ते टोकाला गेल्यावर दोघेही विभक्त होण्याचा विचार करतात. तेव्हा वेळ येते घटस्फोटाची  पण घटस्फोटासाठीही लोक लाखो-करोडो रुपये खर्च करतात असं तुम्ही कधी ऐकलंय का? पण असा एक घटस्फोट झालाय तो एक-दोन लाख नाहीतर तब्बल 600000 कोटींमध्ये झाला आहे.

अब्जाधीश जोडपे बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स  हे दोघेही विभक्त झाले आहेत. त्यांच्या याच घटस्फोटासाठी तब्बल 600000 कोटी रुपये लागले आहेत. त्यांनी 4 मे 2021 रोजी ट्विटरवर आपल्या विभक्त होण्याच्या निर्णयाबद्दल सर्वांना सांगून सर्वांना मोठा धक्का दिला. जेव्हा बिल गेट्स यांनी घटस्फोटाची घोषणा केली तेव्हा प्रत्येकाला पोटगीची रक्कम जाणून घ्यायची होती. कारण आपण जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींबद्दल बोलत आहोत.

बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स यांच्या घटस्फोटातील नेमकी पोटगीची रक्कम मीडियामध्ये उघड झाली नसली तरी मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी त्यांची पूर्व पत्नी मेलिंडा गेट्स यांना भरीव रक्कम दिली असल्याचे अहवालात म्हटले आहे. बिल गेट्स यांनी मेलिंडा गेट्स यांना अंदाजे US$73 अब्ज म्हणजेच 600000 कोटी रुपये दिले, ज्यामुळे ती जगातील सर्वात श्रीमंत महिलांपैकी एक बनली.

बिल गेट्स यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती

बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स यांनी 27 वर्षांनी एकत्र राहिल्यानंतर विभक्त होण्याची घोषणा करताना सर्वांनाच धक्काच दिला. फोर्ब्सच्या मते, बिल गेट्सची संपत्ती आता $119.4 अब्ज इतकी आहे. या जोडप्याने 3 मे 2021 रोजी एका संयुक्त निवेदनात घटस्फोटाची घोषणा केली. ज्यामध्ये त्यांनी आमच्या नात्यावर खूप विचार केल्यानंतर आणि खूप काम केल्यानंतर आम्ही आमचे नाते संपवण्याचा निर्णय घेतला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.