Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गोव्यात मर्सिडीजची 5 वाहनांना धडक; 3 जणांचा मृत्यू

गोव्यात मर्सिडीजची 5 वाहनांना धडक; 3 जणांचा मृत्यू 


पणजी 07 ऑगस्ट : रस्ते अपघातात लोकांना जीव गमवावा लागल्याच्या अनेक घटना दररोज समोर येत असतात. अनेकदा काही चूक नसताना समोरच्याच्या चुकीमुळे लोकांना आपला जीव गमवावा लागतो. गोव्यातून आता अशाच एका भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. यात रस्ते अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. तर, दोघं गंभीर जखमी आहेत.गोव्यात बनस्ट्रीम पुलावर हा भीषण अपघात झाला आहे. यात 5 वाहनांची धडक झाली. अपघात इतका भीषण होता की यात तिघांचा मृत्यू झाला आहे. तर दोघं गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांना असा संशय आहे की पुलावर काही लोक दारू पिऊन गाडी चालवत होते. याच कारणामुळे हा भीषण अपघात झाला आहे.

पोलीस सध्या या घटनेचा अधिक तपास करत आहेत धावत्या ट्रकचा ब्रेक फेल झाला अन् तिघांचा क्षणात शेवट, गडचिरोलीतील घटनासुरुवातीच्या तपासात असं समोर आलं आहे, की हाय एंड कार मर्सिडीजने इतर गाड्यांना धडक दिली. मर्सिडीजने 3 ते 4 कारला जोरात धकड दिल्याने यात तिघांचा मृत्यू झालं असल्याचं सांगण्यात येत आहे.गडचिरोलीतही भीषण अपघात - भीषण अपघाताची आणखी एक घटना गडचिरोलीमधूनही समोर आली आहे. गडचिरोली जिल्ह्यात सुरजागड लोहखनीच प्रकल्पामध्ये रविवारी संध्याकाळी हा अपघात झाला. यात एका हायवे ट्रकचा ब्रेक फेल झाला. यानंतर हे वाहन बोलेरो कँपर वाहनावर आदळलं. या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण जखमी आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.